शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
6
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
7
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
8
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
9
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
10
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
11
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
12
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
13
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
14
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
15
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
16
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
17
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
18
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
19
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
20
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

मध्यवर्ती कारागृहात धान शेतीची खाचरं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2020 05:01 IST

शासनाच्या आदेशानुसार प्रत्येक मध्यवर्ती कारागृहात ५० बंदीजन क्षमतेचे खुले कारागृह साकारण्यात आले आहे. येथे ४४ कैदी आहेत. त्यांना मध्यवर्ती कारागृहातच बंदिस्त ठेवले जाते. मात्र, दिवसभर कामासाठी बाहेर असतात. हल्ली खुले कारागृहाच्या बंदीजनांवर शेती, शेळीपालन, मस्त्यपालन, पशुपालनाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. पावसाळा सुरू झाल्याने पेरणीची कामे वेगाने सुरू आहेत.

ठळक मुद्देरोजगाराचे साधन : खुल्या कारागृहातील १० कैद्यांकडे जबाबदारी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मध्यवर्ती कारागृहात कैद्यांनी धान शेतीची कास धरली आहे. पाच वर्षांपासून धान शेतीचा प्रयोग यशस्वी होत असून, यंदा मंगळवारी तीन एकर परिसरात धानाची रोवणी करण्यात आली. कारागृहाने श्रीराम प्रजातीची निवड केली आहे.शासनाच्या आदेशानुसार प्रत्येक मध्यवर्ती कारागृहात ५० बंदीजन क्षमतेचे खुले कारागृह साकारण्यात आले आहे. येथे ४४ कैदी आहेत. त्यांना मध्यवर्ती कारागृहातच बंदिस्त ठेवले जाते. मात्र, दिवसभर कामासाठी बाहेर असतात. हल्ली खुले कारागृहाच्या बंदीजनांवर शेती, शेळीपालन, मस्त्यपालन, पशुपालनाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. पावसाळा सुरू झाल्याने पेरणीची कामे वेगाने सुरू आहेत. कारागृहाची ७० ते ७५ एकर शेती असून, हंगामानुसार पिके घेण्यात येतात. वर्षभराच्या भाजीपाला, कांदे, गव्हाचे उत्पादन घेतले जाते. धान शेतीसाठी १० कैदी नेमण्यात आले आहेत.धान शेतीसाठी गुडघाभर पाण्यात श्रमकारागृहात धान शेतीसाठी कैद्यांनी गुडघाभर पाणी साचून राहील, अशी खाचरं तयार केली आहेत. या खाचरांमध्ये धानाची रोवणी करण्यात आली. त्यासंबंधी कौशल्य असलेल्या बंदीजनांकडे ही जबाबदारी सोपविली आहे.धान शेतीचा प्रयोग पाच वर्षांपासून सुरू आहे. यावर्षीसुद्धा श्रीराम प्रजातीच्या धानाची रोवणी करण्यात आली. खुल्या कारागृहातील कैद्यांना धान शेतीतून रोजगार उपलब्ध होतो.- रमेश कांबळे,अधीक्षक, मध्यवर्ती कारागृह.

टॅग्स :jailतुरुंगagricultureशेती