इन्स्टाग्रामवरील मैत्री पडली महागात ! अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्याला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2026 15:43 IST2026-05-04T15:41:50+5:302026-05-04T15:43:49+5:30
Amravati : सोशल मीडियाच्या माध्यमातून अल्पवयीन मुलीला जाळ्यात ओढून तिचा विनयभंग करणाऱ्या आणि खासगी फोटो व्हायरल करून कुटुंबाला धमकावणाऱ्या बाबू हसन (२२, रा. मुरादाबाद, उ.प्र.) याला अमरावती ग्रामीण पोलिसांनी हिमाचल प्रदेशातून अटक केली आहे.

Friendship on Instagram cost money! Man arrested for molesting minor girl
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : सोशल मीडियाच्या माध्यमातून अल्पवयीन मुलीला जाळ्यात ओढून तिचा विनयभंग करणाऱ्या आणि खासगी फोटो व्हायरल करून कुटुंबाला धमकावणाऱ्या बाबू हसन (२२, रा. मुरादाबाद, उ.प्र.) याला अमरावती ग्रामीण पोलिसांनी हिमाचल प्रदेशातून अटक केली आहे. ३० एप्रिल रोजी झालेली ही कारवाई सायबर गुन्हेगारांसाठी मोठा इशारा मानली जात आहे.
मैत्रीचे रूपांतर छळात
पीडिता आणि आरोपीची दोन वर्षांपूर्वी इन्स्टाग्रामवर ओळख झाली होती. जानेवारी महिन्यात नागपूर येथे झालेल्या भेटीत आरोपीने पीडितेच्या इच्छेविरुद्ध तिचे काही खासगी फोटो काढले. पीडितेने त्याला ब्लॉक केल्यावर आरोपीने तिचा छळ सुरू केला. त्याने पीडितेच्या आईला धमकातन तिचे आक्षेपार्ह फोटो आजीच्या मोबाईलवर पाठवून बदनामी केली. २६ एप्रिल रोजी बेनोडा (ता. वरूड) पोलिसांत तक्रार दाखल होताच तपास सरू झाला.
हिमाचलमध्ये दडला होता
गुन्हा दाखल होताच आरोपी मुरादाबादहून फरार झाला होता. मात्र, तांत्रिक तपासाच्या आधारे तो हिमाचल प्रदेशातील बिलासपूर येथील एका फॅक्टरीत लपल्याचे निष्पन्न झाले. अमरावती पोलिसांनी तिथे पोहोचून त्याला बेड्या ठोकल्या, आरोपीवर 'पोक्सो' आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, सध्या त्याची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे. या कारवाईमुळे सोशल मीडिया वापरणाऱ्या अल्पवयीन मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.