शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती-पुणे शिवशाही आजपासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2020 05:01 IST

पहिल्या टप्यात महामंडळाने जिल्हातंर्गत बस फेऱ्या सुरू केल्या. त्यानंतर २० ऑगस्ट पासून जिल्ह्याबाहेर बसफेऱ्या सुरू करण्यात आल्यात. परंतु लांबपल्यावर धावणाऱ्या बसेस बंद होत्या. रविवारी अमरावती - पुणे ही लांबपल्ल्यावर धावणारी पहिली विनावातानुकूलित शिवशाही बस मध्यवर्ती बसस्थानकावरील फलाट क्रमांक ९ वरून सोडण्यिात येणार आहे. सदरची बस ही आसनी, शयनी प्रकारामध्ये सुरू करण्यात येत आहे.

ठळक मुद्देविनावातानुकूलित : मध्यवर्ती बसस्थानकाहून सायंकाळी ६ वाजता सुटणार

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावामुळे स्थगित असलेली राज्य परिवहन महामंडळाची अमरावती - पुणे ही बस ६ सप्टेंबर रोजी येथील मध्यवर्ती बसस्थानकाहून सांयकाळी ६ वाजता सोडली जाणार आहे. मागील मार्च महिन्यापासून एसटी बसफेऱ्या महामंडळाने बंद केल्या होत्या. पहिल्या टप्यात महामंडळाने जिल्हातंर्गत बस फेऱ्या सुरू केल्या. त्यानंतर २० ऑगस्ट पासून जिल्ह्याबाहेर बसफेऱ्या सुरू करण्यात आल्यात. परंतु लांबपल्यावर धावणाऱ्या बसेस बंद होत्या. रविवारी अमरावती - पुणे ही लांबपल्ल्यावर धावणारी पहिली विनावातानुकूलित शिवशाही बस मध्यवर्ती बसस्थानकावरील फलाट क्रमांक ९ वरून सोडण्यिात येणार आहे. सदरची बस ही आसनी, शयनी प्रकारामध्ये सुरू करण्यात येत आहे. या बससाठी आगाऊ आरक्षणाची सुविधा एसटी महामंडळाने उपलब्ध करून दिली आहे. या लांबपल्याच्या बस करीता १० प्रवाशांनी महामंडळाकडे आगाऊ आरक्षण केले आहे. विशेष म्हणजे अमरावती पुणे ही बस पूर्वी वातानुकूलित होती. परंतु कोरोनामुळे एसी गाडी चालविता येत नसल्याने ही गाडी आता वातानुकूलित असणार नाही. अमरावती औरंगाबाद पर्यंचे भाडे ६१० रुपये तर अमरावती पुणे पर्यंतचे भाडे १०२५ रुपये आकारले जाणार आहे.प्रवाशांचा वाढता प्रतिसाद१५ दिवसांपासून महामंडळाच्या बसने वेग घेतला असून अनेक मार्गावर प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे. एसटी महामंडळाच्या बसेसवर सर्वसामान्य नागरिकांचा असलेला विश्वास परत एकदा अधोरेखित झाला आहे.एसटी महामंडळाच्या बसेसना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. कोरोना बाबत सर्व काळजी आम्ही घेत आहोत.येत्या काही दिवसात सर्व मार्गांवरील वाहतूक नेहमीप्रमाणे सुरू करण्याचे नियाजन आम्ही आखले आहे.- श्रीकांत गभणे ,विभाग नियंत्रक, अमरावती

टॅग्स :Shivshahiशिवशाहीstate transportएसटी