शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
2
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
3
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
4
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
5
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
6
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
7
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
8
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
9
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
10
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
11
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
12
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
13
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
14
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
15
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
16
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
17
Petrol Diesel Rate: पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? केंद्र सरकारचे मोठे संकेत
18
WTC 2025-27 Points Table : बांगलादेशचा पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय! टीम इंडिया फायद्यात; ते कसं?
19
सावधान! ९९% लोकांना टरबूज खाण्याची योग्य पद्धतच माहीत नाही; डॉक्टरांनी सांगितलेल्या 'या' ३ चुका पडू शकतात महागात
20
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीन बियाण्याचे दर आवाक्याबाहेर!

By admin | Updated: June 2, 2014 01:47 IST

पेरण्या सुरू होण्यापूर्वीच सोयाबीन बियाण्याच्या किमतीत प्रतिबॅग ९00 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

संतोष येलकर / अकोला

या वर्षीच्या खरीप हंगामातील पेरण्या सुरू होण्यापूर्वीच सोयाबीन बियाण्याच्या किमतीत प्रतिबॅग ९00 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. गतवर्षीच्या तुलनेत बियाणे कंपन्यांकडून यावर्षी सोयाबीन बियाण्याच्या किमती भरमसाठ वाढविण्यात आल्याने, सोयाबीन बियाण्याचे दर शेतकर्‍यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. सोयाबीन कापणीच्या वेळी पावसामुळे सोयाबीन बियाणे भिजले. त्यामुळे उगवणक्षमता कमी झाल्याने, विविध कपन्यांचे सोयाबीन बियाणे ह्यनापासह्ण झाले. त्यामुळे महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळासह (महाबीज) विविध खासगी कंपन्यांकडून बाजारात होणारा सोयाबीन बियाण्याचा पुरवठा कमी होत आहे. बियाणे कमी उपलब्ध असल्याची संधी हेरून बियाणे कंपन्यांकडून सोयाबीन बियाण्याच्या किमती अव्वाच्या सव्वा वाढविण्यात आल्या आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी शेतकर्‍यांकडून मागणी असलेल्या सोयाबीन या प्रमुख वाणाच्या बियाणे दरांमध्ये यावर्षी ९00 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. तसेच कमी मागणी असलेल्या सोयाबीन बियाण्याच्या दरातही ४00 रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. यावर्षीच्या खरीप हंगामातील पेरण्या सुरू होणे अद्याप बाकी असतानाच, सध्या बाजारात ह्यमहाबीजह्णचे सोयाबीन बियाणे ३0 किलोची प्रतिबॅग २ हजार ३८५ रुपये दराने बियाणे विक्रेत्यांकडून विकली जात आहे. तर शेतकर्‍यांची मागणी असलेल्या प्रमुख कंपन्यांचे सोयाबीन बियाणे २ हजार ५५0 रुपये ते २ हजार ६३0 रुपये दराने विकले जात आहे. त्यामुळे खरीप पेरण्या सुरू होण्यापूर्वीच यावर्षी सोयाबीन बियाण्याचे दर शेतकर्‍यांच्या आवाक्याबाहेर गेल्याचे दिसत आहे. पेरण्या सुरू झाल्यानंतर सोयाबीन बियाण्यासाठी शेतकर्‍यांच्या मागणीत वाढ होणार आहे; त्यासोबतच सोयाबीन बियाण्याच्या दरांमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.