शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना पळवून पळवून मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले... 
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
4
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
5
आता खासगी शाळांमध्येही फक्त NCERT पुस्तके, महागड्या पुस्तकावर बंदी; NHRC ने राज्यांना दिला ३० दिवसांचा वेळ
6
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
7
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
8
Trinamool Congress vs BJP: तृणमूल अन् भाजप यांच्यात थेट लढत; ‘तिसरी आघाडी’मुळे कोणाचा स्वप्नभंग
9
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
10
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
11
तामिळनाडूमध्ये ५.७३ कोटी मतदार ठरवणार ४,०२३ उमेदवारांचे भवितव्य, 'या' जागांवर सर्वांची नजर
12
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
13
वरातीदरम्यान, कुत्र्याचा धुमाकूळ, ६० जणांचा घेतला चावा, वाचण्यासाठी वऱ्हाड्यांची पळापळ  
14
ताडगोळ्यांना इंग्रजीत काय म्हणतात माहीत आहे का? हे पाणीदार फळ कुणी खावं, कुणी टाळावं?
15
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
16
पैसा, प्लॉट, घर गेले, मातृछत्रही हरवले, ‘त्या’ शहीदपुत्राची हृदयद्रावक कहाणी! नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
17
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
18
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
19
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
20
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Assembly Election 2019 : अकोला पश्चिम मतदारसंघात मतांचे विभाजन?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2019 12:14 IST

काँग्रेसच्यावतीने साजिद खान पठाण तसेच वंचित बहुजन आघाडीच्यावतीने मदन भरगड यांच्या दावेदारीमुळे यंदाची निवडणूक त्रिशंकू होईल.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया आटोपल्यानंतर अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात मतांचे विभाजन झाल्याची चर्चा आहे. यामध्ये प्रामुख्याने जुने शहरातील डाबकी रोड, बाळापूर रोड, हरिहरपेठ, सोनटक्के प्लॉट, गुलजारपुरा, पोळा चौक आदी परिसराचा समावेश आहे. संबंधित भागातील मतदान केंद्रावर मतदारांची उसळलेली गर्दी व डाबकी रोड भागातील मतदान केंद्रावरील शुकशुकाट पाहता काँग्रेसच्या गोटात उत्साहाचे वातावरण दिसून आले. तर भाजप व वंचित बहुजन आघाडीचे निकालाकडे लक्ष लागल्याचे चित्र आहे.विधानसभा मतदारसंघाचे मैदान काबीज करण्यासाठी मैदानात उतरलेल्या उमेदवारांनी मागील काही दिवसांपासून प्रचारात रंगत निर्माण केली होती. भाजपच्यावतीने सलग सहाव्यांदा गोवर्धन शर्मा निवडणूक रिंगणात होते. काँग्रेसच्यावतीने साजिद खान पठाण तसेच वंचित बहुजन आघाडीच्यावतीने मदन भरगड यांच्या दावेदारीमुळे यंदाची निवडणूक त्रिशंकू होईल, यावर शिक्कामोर्तब झाले. सोमवारी विधानसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली असता, जुने शहरातील मतदारांमध्ये प्रचंड उत्साह पाहावयास मिळाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानालगतची मनपा मुलांची शाळा क्र. १०, मनपा मुलांची शाळा क्रमांक १, बाळापूर रोडवरील मनपा मुलांची शाळा क्र. १७, हरिहरपेठमधील मनपा मुलांची शाळा क्र. १९, शिवाजी टाऊन, पोळा चौकातील मनपा उर्दू मुलांची शाळा आदी ठिकाणच्या मतदान केंद्रात महिलांची गर्दी उसळल्याचे चित्र होते. संबंधित मतदान केंद्रांवर सायंकाळी ५ नंतरही मतदारांची गर्दी कायम होती. नेमके त्याउलट चित्र डाबकी रोड परिसरातील खासगी शाळा, महाविद्यालयात दिसून आले. संबंधित शाळा, महाविद्यालयांमध्ये सायंकाळी ५ वाजेपर्यंत केवळ ३३ टक्के मतदान झाल्याचे चित्र होते.हक्क बजावण्यासाठी महिलांचा पुढाकारपश्चिम मतदारसंघातील हरिहरपेठ, पोळा चौक, बाळापूर रोड, गुलजार पूरा, भिम नगर, खैदमोहम्मद प्लॉट, हमजा प्लॉट, चाँदखा प्लॉट, अकोट फैल, नायगाव आदी परिसरातील मतदान केंद्रांवर मतदानाचा हक्क बजावण्यासाठी महिला मतदारांची प्रचंड गर्दी झाल्याचे चित्र दिसून आले. मतदान जनजागृतीमुळे महिलांनी पुढाकार घेतल्याचे बोलल्या जात आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019akola-west-acअकोला पश्चिमVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीBJPभाजपाcongressकाँग्रेस