शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
2
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
3
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
4
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
5
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
6
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
7
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
8
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
9
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
10
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
11
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
12
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
13
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
14
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
15
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
16
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
17
Petrol Diesel Rate: पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? केंद्र सरकारचे मोठे संकेत
18
WTC 2025-27 Points Table : बांगलादेशचा पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय! टीम इंडिया फायद्यात; ते कसं?
19
सावधान! ९९% लोकांना टरबूज खाण्याची योग्य पद्धतच माहीत नाही; डॉक्टरांनी सांगितलेल्या 'या' ३ चुका पडू शकतात महागात
20
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्यात सार्वजनिक ठिकाणी सर्रास तंबाखू सेवन

By admin | Updated: July 19, 2014 01:32 IST

अकोला शहरातील बसस्थानक, रेल्वे स्टेशन, बगिचे, रुग्णालये आणि बाजार आदी ठिकाणी नेहमीच धूम्रपान होत आहे.

अकोला : लोकांच्या आरोग्याच्या हितासाठी सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यास बंदी घालण्यात आली आहे; परंतु याकडे दुर्लक्ष करीत सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणे आता प्रतिष्ठेचे होऊन बसले आहे. अकोला शहरातील बसस्थानक, रेल्वे स्टेशन, बगिचे, रुग्णालये आणि बाजार आदी ठिकाणी नेहमीच धूम्रपान होत असल्याचे दिसते. सार्वजनिक ठिकाणी थुंकणे हा तर आपला जन्मसिद्ध हक्क आहे, या तोर्‍यात लोक थुंकत असतात. याला शासकीय कार्यालयेदेखील अपवाद नाहीत. शासकीय कार्यालयांमध्ये कामासाठी येणारे लोक तर धूम्रपान करतातच, शासकीय कर्मचारीदेखील सर्वांसमोर धूम्रपान करताना दिसून येतात. शासकीय कार्यालयांच्या भिंती तर थुंकल्यामुळे चांगल्याच रंगल्या आहेत. ज्यांनी कायद्याचे पालन करायचे तेच शासकीय कर्मचारी कायदा तोडताना दिसतात, तर मग सर्वसामान्य नागरिकांना कोण म्हणणार.
शुक्रवारी ह्यलोकमतह्णच्या चमूने सकाळपासून सार्वजनिक ठिकाणांचा आणि शहरातील शासकीय कार्यालयांचा दौरा केला. या दौर्‍यात सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणारे आढळून आले. शासकीय कार्यालयांमध्ये तर मोठय़ा प्रमाणात पान-गुटख्यामुळे रंगलेल्या भिंती दिसून आल्या. याबाबत अधिकार्‍यांना विचारले तर ह्यकाय करणार, हे तर रोजचेच आहे, कोण समजविणार, समजावून तर आम्ही थकलो आहोतह्ण अशी उत्तरे मिळाली. शेवटी शासनाच्या कायद्याचे पालन
करणार कोण, हा प्रश्न कायम आहे.