शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
2
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
3
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
4
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
5
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
6
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
7
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
8
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
9
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
10
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
11
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
12
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
13
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
14
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
15
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
16
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
17
Petrol Diesel Rate: पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? केंद्र सरकारचे मोठे संकेत
18
WTC 2025-27 Points Table : बांगलादेशचा पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय! टीम इंडिया फायद्यात; ते कसं?
19
सावधान! ९९% लोकांना टरबूज खाण्याची योग्य पद्धतच माहीत नाही; डॉक्टरांनी सांगितलेल्या 'या' ३ चुका पडू शकतात महागात
20
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
Daily Top 2Weekly Top 5

वादळी पावसाने अकोलेकरांची दाणादाण !

By admin | Updated: June 3, 2014 01:59 IST

घरावरील टीन उडाले, वृक्ष उन्मळून पडली, वाहतुकीला खोळंबा, वीज पुरवठा खंडित, एक जखमी

अकोला : दोन दिवसांपासून जिल्ह्यात वादळी वार्‍यासह अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला असून, पावसापेक्षा वार्‍याचा वेग अधिक असल्यामुळे सोमवारी अकोलेकरांची दाणादाणा उडाली. मुख्य डाकघराजवळील होर्डिंग्ज रस्त्यावर कोसळून एक इसम जखमी झाला. अनेक ठिकाणी घरावरील टीन उडाले, वृक्ष रस्त्यावर उन्मळून पडली, रस्त्यावर पाणी साचल्यामुळे वाहतुकीला खोंळबा झाला. जुने शहरासह शहरातील इतर भागातील वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे काळोख पसरला होता.
दोन दिवसांपासून जिल्ह्यात वादळी पाऊस सुरू आहे. सोमवार, २ जून रोजी ४ वाजेपर्यंत ४४.४ अंश डिग्री तापमान होते. ४ वाजतानंतर अचानक ढग भरू न आले. सोसाट्याचा वारा सुटला. या वार्‍यामुळे मुख्य डाकघरासमोरील होर्डिंग्ज रस्त्यावर कोसळल्याने विठ्ठल कांबळे जखमी झाले. रणपिसेनगरातील प्रोफेसर कॉलनीत वृक्ष रस्त्यावर उन्मळून पडल्यामुळे या भागातील वाहतुकीला खोंळबा झाला. मोठी उमरीजवळली रेल्वे पुलाखाली प्रचंड पाणी साचल्याने या भागातील वाहतूक काहीवेळ ठप्प पडली होती. बारा ज्योर्तिलिंग मंदिरासमोर पाणी साचले होते. वृंदावननगरातील घरावरील टीन उडून खांबावर लटकले, सिव्हिल लाईन चौकातील टिनाचे शेड रस्त्यावर पडले होते. आकोट फैल, न्यू तापडियानगर या भागातील देवीच्या मंदिरासमोरील चोपडे गुरुजी यांच्या घरावरील टीन उडाले होते.

** जुने शहर काळोखात
वादळी पावसामुळे जुने शहरातील वीज पुरवठा पूर्णत: खंडित झाला. शहरातील इतर भागातील वीज गायब झाल्यामुळे नगरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला.

** लघुउद्योजकांची त्रेधातिरपिट
अचानक विजांचा कडकडाटात आलेल्या वादळीपावसामुळे फेरीवाले, लघुउद्योजकांची चांगलीच धांदल उडाली, वादळामुळे अनेकांचे नुकसान झाले.

** वातावरणात गारवा
अचानक आलेल्या पावसामुळे वातावरणात गारवा पसरल्यामुळे अस‘ उकाड्यातून नागरिकांना हायसे वाटले. दरम्यान, मंगळवार व बुधवारी तापमानात मोठी वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.