शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2025 19:52 IST

Kiran Lahamte Accident News: अजित पवार गटाचे आमदार किरण लहामटे यांच्या गाडीला अपघात झाला. समोरून येणाऱ्या भरधाव ट्रकने त्यांच्या कारला जोरदार धडक दिली.

अजित पवार गटाचे आमदार डॉ. किरण लहामटे यांच्या गाडीला अपघात झाल्याची बातमी समोर आली. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथील विठे घाटात विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव ट्रकने त्यांच्या कारला जोरदार धडक दिली.  या अपघातात लहामटे थोडक्यात बचावले. जवळच्या रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आल्यानंतर लहामटे आपल्या निवासस्थानी परतले. 

मिळालेल्या माहितीनुसार, आमदार लहामटे हे अकोले येथून राजूरकडे जात असताना विठे घाटात विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव ट्रकने त्यांच्या कारला जोरदार धडक दिली. दैव बलवत्तर म्हणून आमदार लहामटे थोडक्यात बचावले. अपघातानंतर जवळच्या रुग्णालयात प्राथमिक उपचार घेऊन लहामटे हे त्यांच्या राजूर येथील निवासस्थानी परतले. या अपघातात लहामटे यांच्या कारचे मोठे नुकसान झाल्याचे समजत आहे.

आमदार लहामटे यांनी समाज माध्यमातून आपल्या अपघाताची स्वतः माहिती दिली. "विठे घाटात माझ्या वाहनाला अपघात झाला. कोणतीही दुखापत झालेली नाही. आपण पूर्णपणे सुखरूप असून, राजूर निवासस्थानी आहोत. त्यामुळे कार्यकर्ते हितचिंतक यांनी काळजी करू नये", असे आवाहन त्यांनी समाजमाध्यमातून केले.

डॉ. किरण लहामटे हे अकोले विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या अकोले मतदारसंघातून २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आले. या निवडणुकीत त्यांनी भाजपच्या वैभव पिचड यांचा पराभव केला.

दरम्यान, राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर लहामटे यांनी अजित पवार गटाला पाठिंबा दर्शविला. मात्र,  काही दिवसांनंतर त्यांनी आपली भूमिका बदलली आणि शरद पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला. राजकीय समीकरणांमध्ये पुन्हा बदल झाला आणि ते पुन्हा एकदा अजित पवारांच्या गटात सामील झाले.

टॅग्स :AccidentअपघातAhilyanagarअहिल्यानगरAjit Pawarअजित पवार