शहरं
Join us  
Trending Stories
1
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
2
Top Marathi News LIVE Updates: "दादांच्या अंत्यविधीच्या दिवशी १६ कोटी दिले"; रोहित पवारांचा 'व्हीएसआर' कंपनीवरून सरकारवर हल्ला
3
Mutual Fund Redemption Rules: काय आहे FIFO नियम आणि तो कसा वाचवतो तुमचा टॅक्स? जाणून घ्या डिटेल्स
4
बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने झाला 'त्या' चार जणांचा मृत्यू? पोस्टमार्टेम रिपोर्टमधून समोर आलं खरं कारण
5
एका दुखापतीने संपवलं करियर.. अवघ्या ३०व्या वर्षी क्रिकेटपटूला करावी लागली निवृत्तीची घोषणा
6
Chanakya Niti: समाजात राजासारखा मान हवा? चाणक्यनीतीतल्या 'या' ५ सवयी तुमचं आयुष्य बदलतील!
7
भारत-न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक 'मैत्री'! ५००० भारतीयांना थेट नोकरीची संधी, मोठे फायदे कोणते?
8
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
9
Gold-Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात बदल; पटापट चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K आणि १८K Gold चे नवे दर
10
घरात मोबाइल नेटवर्क मिळणे झाले कठीण; इमारतींना ‘डिजिटल रेटिंग’ देण्याचा ‘ट्राय’चा निर्णय
11
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातने पीडितेला दिली दैवी शक्तीने मुलांना ठार मारण्याची धमकी
12
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
13
TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन
14
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
15
'सैराट'फेम अभिनेता 'राजा शिवाजी'मध्ये झळकणार, रितेशसोबत फोटो पोस्ट करत म्हणाला...
16
एका शेअरवर २४० रुपयांचा डिविडंड देणार 'ही' कंपनी; नफ्यात जोरदार वाढ झाल्यानंतर कंपनीची घोषणा, तुमच्याकडे आहे का?
17
रणरागिणी! ज्वेलरी शोरुममध्ये शिरलेल्या चोराला १८ वर्षांची मुलगी भिडली; धाडसाचा Video व्हायरल
18
आयपीएलच्या इतिहासातील 'लो-स्कोअरिंग' सामना कुठला? अवघ्या ४९ धावांवर ऑलआऊट झाला होता 'हा' संघ
19
घसरणीसह उघडला शेअर बाजार, 'या' स्टॉक्सनं रेड झोनमध्ये केली कामकाजाला सुरुवात
20
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
Daily Top 2Weekly Top 5

मनपा रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरच प्रसूती

By admin | Updated: September 6, 2016 00:49 IST

अहमदनगर : महापालिकेच्या कै. बाळासाहेब देशपांडे रुग्णालयात प्रसूतीसाठी आलेल्या महिलेला वेळेवर दाखल करून न घेतल्याने महिलेची रिक्षातून रुग्णालयाच्या प्रवेशद्वारापर्यंत येत असतानाच प्रसूती झाली.

अहमदनगर : महापालिकेच्या कै. बाळासाहेब देशपांडे रुग्णालयात प्रसूतीसाठी आलेल्या महिलेला वेळेवर दाखल करून न घेतल्याने महिलेची रिक्षातून रुग्णालयाच्या प्रवेशद्वारापर्यंत येत असतानाच प्रसूती झाली. महिलेचे जन्मलेले अर्भक मृत होते. यामुळे संतप्त झालेल्या महिलेच्या नातेवाईकांनी हलगर्जीपणा करणाऱ्या डॉक्टरवर कारवाईची मागणी केली आहे. सारसनगर भागातील प्रीती महेंद्र जोशी (रा. त्रिमूर्ती कॉलनी) या सोमवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास प्रसूतीसाठी कै. बाळासाहेब देशपांडे रुग्णालयात दाखल झाल्या होत्या. रुग्णालयात उपस्थित डॉक्टरांनी त्यांची कोणतीही तपासणी केली नाही. सोनोग्राफी करण्यासाठी त्यांना शहरातील एका खासगी डॉक्टरकडे जाण्याचा सल्ला रुग्णालयातील काही डॉक्टरांनी दिला. जोशी या त्यांच्या नातेवाईकांना घेवून सोनोग्राफी करण्यासाठी गेल्या, मात्र तेथे गर्दी आणि गणेशोत्सव यामुळे सोनोग्राफी करण्यासाठी नंबर लागला नाही. यावेळी त्यांना त्रास होत असल्याने त्यांना पुन्हा देशपांडे रुग्णालयात रिक्षामधून आणण्यात आले. तेथे त्या रिक्षातून रुग्णालयात येताना प्रवेशद्वारातच प्रसूत झाल्या. महिलेच्या नातेवाईकांनी आरडाओरड करून हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांना पाचारण केले. परंतु १० ते १५ मिनिटे डॉक्टर तिकडे फिरकलेच नाहीत. काही महिला कर्मचाऱ्यांनी जोशी यांना दाखल करून घेतले. यावेळी जन्मलेले अर्भक मृत असल्याचे आढळून आले. यावेळी जोशी यांच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केला. (प्रतिनिधी)आमदार संतापलेघटनेची माहिती मिळताच आमदार संग्राम जगताप, नगरसेवक विपुल शेटिया, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते बाबा गाडळकर, प्रकाश भागानगरे, विकी जगताप, गड्डु खताळ, आदी रुग्णालयात दाखल झाले. संबंधित डॉक्टरांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी आ. जगताप यांनी यावेळी केली. कॉल आॅन डॉक्टर सुविधा असताना महिलेची तपासणी का झाली नाही, असा सवाल आ. जगताप यांनी केला. मात्र डॉक्टरांनी याबाबत मौन बाळगले.घटनेची माहिती मिळाल्यानंतर लगेचच रुग्णालयात दाखल झालो. झालेला प्रकार दुर्दैवी आहे. सदर घटनेची संपूर्ण माहिती घेवून चौकशी केली जाईल. जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.-डॉ. अनिल बोरगे, आरोग्याधिकारी, मनपा