शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
2
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
3
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
4
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
5
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
6
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
7
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
8
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
9
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
10
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
11
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
12
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
13
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
14
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
15
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
16
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
17
Petrol Diesel Rate: पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? केंद्र सरकारचे मोठे संकेत
18
WTC 2025-27 Points Table : बांगलादेशचा पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय! टीम इंडिया फायद्यात; ते कसं?
19
सावधान! ९९% लोकांना टरबूज खाण्याची योग्य पद्धतच माहीत नाही; डॉक्टरांनी सांगितलेल्या 'या' ३ चुका पडू शकतात महागात
20
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
Daily Top 2Weekly Top 5

आवर्तनाने आणले जेरीस

By admin | Updated: June 15, 2014 00:30 IST

श्रीगोंदा : कुकडीचे आवर्तन राजकीय चक्रव्यूहात अडकल्याने तालुक्यातील पिके धोक्यात आली आहेत. त्यामुळे बळीराजाच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

श्रीगोंदा : कुकडीचे आवर्तन राजकीय चक्रव्यूहात अडकल्याने तालुक्यातील पिके धोक्यात आली आहेत. त्यामुळे बळीराजाच्या तोंडचे पाणी पळाले आहे.
गेल्यावर्षी तालुक्यात अतिवृष्टी झाली. त्यामुळे घोड व कुकडी लाभक्षेत्रातील धरणे ओसंडून वाहिली. कुकडी व घोडच्या लाभक्षेत्रात ऊस, फळबागा, भाजीपाला, कपाशीसारखी पिके तरारली. घोडची यापूूर्वी चार आवर्तने सोडण्यात आली. आता कुकडीची तीन आवर्तने सोडण्यात आली.
ंं आवर्तनाची टोलवाटोलवी
कुकडीचे पिण्यासाठी आवर्तन सोडावे अशी मागणी लाभक्षेत्रातील लोकप्रतिनिधींनी केली. सुरुवातीला जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर १५ जून रोजी पिण्यासाठी आवर्तन सुटेल असे गाजर दाखविण्यात आले. मात्र मंत्रिमंडळाच्या बैठकीविना कुकडीचे आवर्तन सोडता येणार नाही, असे प्रशासनाने स्पष्ट करुन आवर्तनाचा चेंडू मुख्यमंत्र्यांच्या दालनात टाकला.
कुकडी प्रकल्पातील धरणांमधील खालावलेला पाणीसाठा, पिंपळगाव जोगे धरणातील डेड स्टॉकमधील पाण्याचे राजकारण व विधानसभा निवडणुकीचे वेध लक्षात घेऊन कुकडीचे पिण्यासाठी आवर्तन सोडावे, अशी मागणी तालुक्यातून मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली. परंतु मंत्रिमंडळाच्या बैठकीविना कोणत्याच धरणातून पाणी सोडता येणार नाही, अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतली.
(तालुका प्रतिनिधी)
आवर्तन अशक्य
कुकडीचे पिण्यासाठी आवर्तन सोडावे, अशी मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे केली होती. परंतु मंत्रिमंडळाच्या बैठकीविना कोणत्याच धरणातून पाणी सोडता येणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे तातडीने आवर्तन सोडणे सध्या अशक्य आहे.
बबनराव पाचपुते,
आमदार, श्रीगोंदा
बैल गेला अन्
कुकडी व घोडच्या चौथ्या आवर्तनाचा निर्णय एकत्रित घेण्यासाठी लोकप्रतिनिधींनी ठाम भूमिका घेणे आवश्यक होते. वरिष्ठ पातळीवर कोणी बोलत नाही. आता कुकडी, घोडच्या आवर्तनाची ‘बैल गेला अन् झोपा केला’ अशी अवस्था झाली आहे.
- शिवाजीराव नागवडे,
ज्येष्ठ नेते, श्रीगोंदा
जबाबदार कोण ?
कुकडीची चार आवर्तने सोडता येतील, अशी परिस्थिती होती. कुकडीचे पाच टीएमसी पाणी पुणेकरांनी कुठे पळविले? याचा थांगपत्ता लागू दिला नाही. आता शेतकऱ्यांची पिके जळाल्यास कोण नुकसान भरपाई देणार?
- बाळासाहेब नाहाटा,
सभापती, बाजार समिती, श्रीगोंदा
हिशोब मिळेल का?
आम्ही कुकडीच्या पाण्यासाठी भांडलो. त्यावेळी काही नेत्यांना राजकारण दिसले. कुकडीच्या चौथ्या आवर्तनाचे पाणी कुठे मुरले याचा हिशोब जनतेला मिळेल का? घोडप्रमाणे कुकडी लाभधारकांना केव्हा न्याय मिळणार?
- राहुल जगताप,
अध्यक्ष, कुकडी साखर कारखाना