शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
5
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
6
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
7
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
8
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
9
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
10
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
11
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
12
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
13
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
14
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
15
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
16
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
17
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
18
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
19
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
20
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

बनावट नोटा वितरणाचे जिल्हाभर जाळे

By admin | Updated: September 18, 2016 01:51 IST

अहमदनगर : नगर शहरासह जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून बनावट नोटांची तस्करी करून वितरण करणाऱ्या चौघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली

अहमदनगर : नगर शहरासह जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून बनावट नोटांची तस्करी करून वितरण करणाऱ्या चौघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली असून, आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे़ पोलीस तपासात पाचव्या आरोपीचे नाव समोर आले असून, तोच या रॅकेटचा मास्टरमाइंड असल्याचे समजते़ पोलीस आता या आरोपीच्या शोधात आहेत़ पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून शुक्रवारी सायंकाळी शहरातील पाईलाईन रोडवरील हॉटेल प्रियदर्शनी येथून संतोष बबन गवारे (वय ३३ रा़सोनई) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे २ लाख ९ हजार रुपयांच्या बनावट नोटा आढळून आल्या़ यामध्ये १००० हजार ५०० रुपयांचे बंडल होते़ पोलिसांनी गवारे याच्याकडे चौकशी केली असता त्याने उर्वरित साथीदारांचीही नावे सांगितली़ पोलिसांनी नगर बसस्थानक व शेवगाव येथून विलास प्रभाकर प्रधान (वय २८ रा़ घोडेगाव) प्रवीण शशीकांत राऊत (वय २३ रा़ केडगाव) यांच्यासह शाहिद नावाच्या आरोपीस ताब्यात घेतले़ आरोपींवर तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ आरोपींना शनिवारी जिल्हा न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली़ (प्रतिनिधी)लाखो रुपयांच्या बनावट नोटा चलनातजिल्ह्यात बनावट नोटा आणून त्या बाजारात चलनात आणणारी टोळीच सक्रिय असल्याचे समोर आले आहे़ या रॅकेटमध्ये आणखी किती आरोपी आहेत़ या नोटा कुठे तयार केल्या जातात तसेच जिल्ह्यात त्यांचे कुठे वितरण होते याचा पोलीस शोध घेत आहेत़ प्रत्येक तालुक्यात एक ते दोन जण या रॅकेटमध्ये काम करत असल्याचे समजते़ या रॅकेटच्या माध्यमातून लाखो रुपयांच्या बनावट नोटा चलनात आल्या आहे़ बनावट नोटांमुळे व्यवहार करताना अनेकांना फटका बसत आहे़ नोटांची निर्मिती अत्याधुनिक प्रिटिंगमध्ये४पोलिसांनी आरोपींकडून हस्तगत केलेल्या नोटा या स्थानिक ठिकाणी बनविलेल्या नसून बाहेर अत्याधुनिक प्रिंटिंग मशीनमध्ये तयार केलेल्या आहेत़ बनावट असलेली ही नोट खोटी असल्याचे सहजासहजी लक्षात येत नाही़ त्यामुळे खरी म्हणून या नोटा मोठ्या प्रमाणात चलनात आलेल्या आहेत़