शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
2
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
3
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
4
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
5
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
6
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
7
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
8
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
9
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
10
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
11
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
12
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
13
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
14
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
15
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
16
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
17
Petrol Diesel Rate: पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? केंद्र सरकारचे मोठे संकेत
18
WTC 2025-27 Points Table : बांगलादेशचा पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय! टीम इंडिया फायद्यात; ते कसं?
19
सावधान! ९९% लोकांना टरबूज खाण्याची योग्य पद्धतच माहीत नाही; डॉक्टरांनी सांगितलेल्या 'या' ३ चुका पडू शकतात महागात
20
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
Daily Top 2Weekly Top 5

साथरोग नियंत्रण कृती आराखडा लागू

By admin | Updated: June 15, 2014 00:30 IST

ज्ञानेश दुधाडे, अहमदनगर जिल्ह्यात पावसाळ्याच्या तोंडावर साथजन्य आजारांचा उद्रेक होऊ नये, पूरग्रस्त गावात आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी जिल्हा परिषदेच्या

ज्ञानेश दुधाडे, अहमदनगर
जिल्ह्यात पावसाळ्याच्या तोंडावर साथजन्य आजारांचा उद्रेक होऊ नये, पूरग्रस्त गावात आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्यावतीने साथरोग नियंत्रण, नैसर्गिक आपत्ती व पूर परिस्थिती नियंत्रण कृती आराखडा तयार केला आहे. यात जिल्ह्यात २४ तास साथ नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून जिल्ह्यात २२३ गावे पूरग्रस्त असल्याचे सांगण्यात आले आहे.
जिल्हा आरोग्य अधिकारी पी.बी. गंडाळ यांनी अधिक माहिती देताना स्पष्ट केले की, जिल्ह्यात प्रवरा, म्हाळुंगी, घोड, भिमा, गोदावरी, मुळा आणि कुकडी या नदी काठावरील २२३ पूरग्रस्त गावांसाठी ९६ आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची पथके तयार केलेली आहेत. जिल्हास्तरावर तीन वैद्यकीय अधिकाऱ्यांची पथके असून तीन नोडल अधिकाऱ्यांची नेमणुका करण्यात आलेल्या आहेत.
जिल्ह्यात २४ तास साथरोग नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून त्या ठिकाणी जिल्ह्यासाठी तातडीची १२ पथके तैनात करण्यात आलेली आहेत. तसेच आपत्ती जोखीम व्यवस्थापनाचे तालुकानिहाय पथके तयार करण्यात आलेली आहेत. जिल्ह्यात एक जिल्हा रुग्णालय, दोन उपजिल्हा रुग्णालय, २३ ग्रामीण रुग्णालय, ९६ प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ५५५ उपकेंद्र आहेत.
जिल्ह्यात ग्रामीण भागात शुध्द पाण्याचा पुरवठा व्हावयासाठी तालुकानिहाय कार्यवाही करण्यात आलेली आहे. अशुध्द पाण्याचा पुरवठा झाल्यास कोणाला जबाबदार धरण्यात यावे, याची दक्षता घेण्यात आलेली आहे. जिल्ह्यात गेल्या तीन वर्षात सातत्याने कावीळ, अतिसार, ग्रॅस्टो, कॉलेरा, डेंग्यू, हिवताप, गोवर आदी आजारांचा उद्रेक झालेल्या गावांची यादी तयार करण्यात आली असून त्यांच्यावर यंदा लक्ष ठेवण्यात येणार असल्याचे अतिरिक्त आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
नदी काठावर असणारी गावे
१) प्रवरा नदी : संगमनेर-१७, श्रीरामपूर- १९ आणि अकोले २४, राहाता ७, राहुरी-२५, नेवासा १२ गावे
२) घोड-भिमा आणि सीना नदी : श्रीगोंदा-१४, कर्जत-१२, जामखेड-३ गावे, म्हाळुंगी, संगमनेर ४ गावे.
३) गोदावरी नदी : श्रीरामपूर -१२, कोपरगाव- २०, शेवगाव १, नेवासा ५ गावे,
४) मुळा नदी : नेवासा ६ गावे.
५) कुकडी- घोड नदी : पारनेर - ६, सीना-९ गावे.
४या गावांसाठी ९६ आरोेग्य पथके तैनात करण्यात आली आहेत.
कर्मचाऱ्यांचा रजा बंद
1जिल्हास्तरावर साथरोग्य नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून त्यात १२ अधिकाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत. हा कक्ष आॅक्टोबर महिन्यांपर्यंत कार्यरत राहणार आहे. याकाळात संबंधीत अधिकारी कर्मचाऱ्यांच्या रजा थांबविण्यात आलेल्या आहेत.
2प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात किमान एक वैद्यकीय अधिकारी कार्यरत राहणार आहे. जून महिन्यांत जलजन्य आजारांविरोधात जनजागृती मोहिम राबविण्यात येणार आहे. तसेच अंगणवाडी सेविका यांना क्षार संजीवनी वापराचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
3जिल्ह्यात गेल्या तीन वर्षात सुमारे १०० गावांत साथजन्य आजारांचा उद्रेक झालेला आहे. या गावांची तालुकानिहाय यादी तयार करण्यात आली असून त्या गावांवर यंदा लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे. त्या ठिकाणी यंदा कोणत्याच साथजन्य आजारांचा उद्रेक होणार नाही, याची काळजी घेण्यात येणार आहे.
4जिल्ह्यात १४ तालुक्यात ६२ लहान मोठे धार्मिक क्षेत्र, यात्रांची ठिकाणे आहेत. त्या ठिकाणी या वर्षी विशेष लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे. तसेच या ठिकाणी साथीचे आजार निर्माण होऊ नयेत, याची काळजी घेण्यात येणार आहेत.
5जिल्ह्यात २२३ पूरग्रस्त गावे आहेत. यात नगर ९, अकोले २५, संगमनेर १७, राहाता ५, श्रीगोंदा १४, श्रीरामपुर २७, राहुरी ३९, नेवासा २६, कर्जत २२, जामखेड ३, कोपरगाव २२, पारनेर १४ यांचा समावेश आहे.