शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
3
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
4
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
5
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
6
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
7
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
8
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
9
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
10
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
11
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
12
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
13
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
14
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
15
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
16
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
17
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
18
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
19
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
20
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळ जिल्ह्यात चार पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ तर पाचजणांना सुट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2020 19:55 IST

गत तीन-चार दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. आजही गुरुवारी जिल्ह्यात चार नवीन पॉझिटिव्ह रुग्णाची नोंद झाली. यात तीन युवक आणि एक युवती आहे. तर पॉझिटिव्ह असलेले पाच जण उपचारानंतर पूर्णपणे बरे झाल्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिका-यांनी केला नागापूर येथे प्रतिबंधित क्षेत्राचा दौरा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गत तीन-चार दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. आजही गुरुवारी जिल्ह्यात चार नवीन पॉझिटिव्ह रुग्णाची नोंद झाली. यात तीन युवक आणि एक युवती आहे. तर पॉझिटिव्ह असलेले पाच जण उपचारानंतर पूर्णपणे बरे झाल्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली आहे.गुरवारी नव्याने पॉझिटिव्ह आलेल्या चारपैकी तीन युवक (वय 28 वर्षे, 33 वर्षे आणि 36 वर्षे) हे महागाव येथील मृत पॉझिटिव्ह व्यक्तिच्या निकटच्या संपर्कातील आहे. तर एक 15 वर्षीय युवती ही नागापूर, ता. उमरखेड येथील मृत पॉझिटिव्ह महिलेच्या निकटच्या संपर्कातील आहे. त्यामुळे जिल्ह्यात अ‍ॅक्टीव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या गुरुवारी 46 वर पोहचली होती. मात्र आयसोलेशन वॉर्डात भरती असलेले व सुरवातीला पॉझिटिव्ह असलेले पाच जण उपचारानंतर पूर्णपणे बरे झाल्यामुळे त्यांना घरी सुट्टी देण्यात आली. त्यामुळे अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 41 वर आली आहे.वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डात एकूण 50 जण भरती आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा 154 आहे. यापैकी 41 अ‍ॅक्टीव्ह पॉझिटिव्ह भरती असून 111 जण बरे होऊन घरी गेले आहेत. तर दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.जिल्हाधिका-यांची प्रतिबंधित क्षेत्राला भेटमहागाव, उमरखेड या भागातून बहुतांश पॉझिटिव्ह रुग्ण येत असल्यामुळे जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी आज नागापूर, ता. उमरखेड येथील प्रतिबंधित क्षेत्राचा दौरा करून आढावा घेतला. यावेळी त्यांच्या निगराणीखाली पल्स आॅक्सीमीटर आणि थर्मल स्कॅनींगने नागरिकांची तपासणी करण्यात आली. प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून लो रिस्क संपर्कातील नागापूर येथील 100 जण आणि महागाव व पुसद येथील प्रत्येकी 50 जण असे एकूण 200 नागरिकांना जवळच्या कोव्हिड केअर सेंटरमध्ये आज रात्री भरती करण्याचे आदेश जिल्हाधिका-यांनी स्थानिक यंत्रणेला दिले.रेड झोनमधून आलेल्या नागरिकांनी स्वत:हून गृह विलगीकरणात राहावे. बाहेरून आलेल्यांनी स्थानिक लोकांच्या संपर्कात येऊ नये. असे प्रकार आढळल्यास गावक-यांनी संबंधित तहसीलदार, तालुका आरोग्य अधिकारी, ठाणेदार किंवा इतर प्रशासकीय यंत्रणेस त्वरीत कळवावे. जेणेकरून गृह विलगीकरण नियमाचे उल्लंघन करणा-या व्यक्तिविरुध्द भादंविच्या कलम 188 नुसार गुन्हा नोंद करता येईल. तसेच बाहेर गावावरून आलेल्या नागरिकांना कोव्हिडसदृश्य लक्षणे, ताप, सर्दी, खोकला, सारी, आयएलआय व इतर लक्षणे असल्यास त्यांनी जवळच्या कोव्हीड केअर सेंटर, कोव्हीड हेल्थ सेंटर, कोव्हीड हॉस्पीटल किंवा 07232-239515 या क्रमांकावर त्वरीत संपर्क करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी केले आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस