शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघातादिवशीच विमान कंपनीला ९ कोटींचे बक्षीस; रोहित पवारांचे खळबळजनक आरोप
2
भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र...
3
Top Marathi News LIVE Updates: "दादांच्या अंत्यविधीच्या दिवशी १६ कोटी दिले"; रोहित पवारांचा 'व्हीएसआर' कंपनीवरून सरकारवर हल्ला
4
Adhar Card : मोठा बदल! आता आधार कार्ड तुमचे वय सिद्ध करणार नाही, तुम्हाला जन्मतारखेचा पुरावा म्हणून 'ही' कागदपत्रे दाखवावी लागणार
5
कलमा वाचता येतो का? विचारले अन् सुरक्षा रक्षकांवर चालवला चाकू; मीरा रोडच्या हल्ल्यात 'लोन वुल्फ'चा संशय
6
Robert Kiyosaki Prediction: रॉबर्ट कियोसाकी यांची २०२६-२७ मध्ये मोठ्या आर्थिक संकटाची भविष्यवाणी; भारतीय गुंतवणूकदारांनी काय करावं?
7
तुमच्या छोट्याशा बाल्कनीला, खिडकीला द्या 'ग्रीन टच'; कमी जागेत बाग फुलवण्याच्या 'मास्टर ट्रिक'
8
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
9
हृदयद्रावक! IPL सामना पाहून घरी परतणाऱ्या २ भावांवर काळाचा घाला; 'हिट अँड रन'मध्ये मृत्यू
10
Mutual Fund Redemption Rules: काय आहे FIFO नियम आणि तो कसा वाचवतो तुमचा टॅक्स? जाणून घ्या डिटेल्स
11
बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने झाला 'त्या' चार जणांचा मृत्यू? पोस्टमार्टेम रिपोर्टमधून समोर आलं खरं कारण
12
एका दुखापतीने संपवलं करियर.. अवघ्या ३०व्या वर्षी क्रिकेटपटूला करावी लागली निवृत्तीची घोषणा
13
Chanakya Niti: समाजात राजासारखा मान हवा? चाणक्यनीतीतल्या 'या' ५ सवयी तुमचं आयुष्य बदलतील!
14
भारत-न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक 'मैत्री'! ५००० भारतीयांना थेट नोकरीची संधी, मोठे फायदे कोणते?
15
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
16
Gold-Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात बदल; पटापट चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K आणि १८K Gold चे नवे दर
17
घरात मोबाइल नेटवर्क मिळणे झाले कठीण; इमारतींना ‘डिजिटल रेटिंग’ देण्याचा ‘ट्राय’चा निर्णय
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातने पीडितेला दिली दैवी शक्तीने मुलांना ठार मारण्याची धमकी
19
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
20
TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन
Daily Top 2Weekly Top 5

मानधनवाढीसाठी आशांचे ‘बेमुदत कामबंद’ आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2019 06:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : शासनाने वारंवार आश्वासन देऊनही मानधनवाढ न मिळाल्याने जिल्ह्यातील आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांनी मंगळवारपासून कामबंद ...

ठळक मुद्देतिरंगा चौकात धरणे : आश्वासनावरच बोळवण करणाऱ्या शासनाचा निषेध, इतर राज्यात भरघोस मानधन

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शासनाने वारंवार आश्वासन देऊनही मानधनवाढ न मिळाल्याने जिल्ह्यातील आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांनी मंगळवारपासून कामबंद आंदोलन पुकारले आहे. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील तिरंगा चौकात धरणे आंदोलन करण्यात आले.ग्रामीण भागात राबणाऱ्या आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांना शासकीय सेवेत कायमस्वरुपी सामावून घेण्यात यावे, तसेच मानधनवाढ लागू करण्यात यावी, या मागण्या प्रलंबित आहेत. त्यामुळे महाराष्ट्र राज्य आशा-गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीच्या नेतृत्वात मंगळवारपासून राज्यभरातच आंदोलन सुरू करण्यात आले आहे. यात यवतमाळ जिल्ह्यातील आशा सेविकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. आशा सेविका आणि गटप्रवर्तकांना वेठबिगारासारखे राबवून घेतले जात आहे. काही राज्यांमध्ये दहा हजार रुपये मानधन असताना महाराष्ट्रात केवळ २५०० रुपये दिले जात आहे. मंत्र्यांनी बैठका घेतल्यानंतरही मानधनवाढीचा प्रश्न मार्गी लागत नसल्याने आशासेविका संतप्त झाल्या आहेत. केवळ आश्वासनावर बोळवण करणाºया शासनाचा यावेळी निषेध नोंदविण्यात आला. निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी शासनाने मानधनवाढीचा विषय मार्गी लावावा, अशी मागणी यावेळी कृती समितीचे राज्य उपाध्यक्ष दिवाकर नागपुरे यांनी दिली.मागण्यांचे निवेदन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना देण्यात आले. मात्र कोणताही तोडगा न निघाल्याने शंभरावर आशासेविका मंगळवारी रात्रीही आंदोलनस्थळीतच होत्या.

टॅग्स :Strikeसंप