शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
4
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
5
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
6
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
7
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
8
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
9
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
10
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
11
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
12
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
13
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
14
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
15
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
16
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
17
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
18
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
19
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
20
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

दोन जुळ्या गावांची होते फरफट

By admin | Updated: September 3, 2015 02:09 IST

येथून १२ किलोमीटर अंतरावरील आणि पांढरकवडा पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या वाढोणा (बु़) व वाढोणा (खुर्द) या दोन जुळ्या गावांची चांगलीच फरफट होत आहे.

पांढरकवडा तालुका : विकासाला लागला ब्रेक, स्वातंत्र्यानंतरही ग्रामस्थांची परवडनरेश मानकर पांढरकवडायेथून १२ किलोमीटर अंतरावरील आणि पांढरकवडा पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या वाढोणा (बु़) व वाढोणा (खुर्द) या दोन जुळ्या गावांची चांगलीच फरफट होत आहे. या दोन्ही गावांचा समावेश दोन वेगळ्या ग्रामपंचायतींमध्ये करण्यात आल्याने स्वातंत्र्य मिळून तब्बल ६८ वर्षे लोटूनही ही गावे उपेक्षित आहेत़ परिणामी दोन्हीही गावातील ग्रामस्थ विविध शासकीय योजनांपासून वंचित राहिले आहेत़राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या धारणा या गावापासून पश्चिमेकडे तीन किलोमीटर अंतरावर वाढोणा (बु़) व वाढोणा (खुर्द) ही दोन गावे आहे. या दोन्ही गावांच्या मधोमध केवळ एक छोटा नाला आहे़ याच नाल्याच्या एका काठावर वाढोणा (बु़), तर दुसऱ्या काठावर वाढोणा (खुर्द) ही खुर्द आणि बुद्रुक नावाने विभागलेली दोन गावे वसलेली आहेत़ वाढोणा (बु़) हे गाव तीन किलोमीटर अंतरावरील धारणा ग्रामपंचायतीला जोडण्यात आले आहे, तर वाढोणा (खु.) हे गाव तब्बल १० किलोमीटर अंतरावरील घोरदडा ग्रामपंचायतीला जोडण्यात आले आहे.ग्रामपंचायतींच्या या सदोष रचनेमुळे दोन्हीही गावांकडे पूर्णत: दुर्लक्ष झाले आहे़ ‘ना घरका, ना घाटका’, अशी या गावांची अवस्था झाली आहे़ शासनाच्या विविध योजनांपासून तसेच सवलतींपासून या गावातील ग्रामस्थ अद्याप वंचितच आहेत़ वाढोणा (बु़) आणि वाढोणा (खु.) या दोन्हीही गावांची लोकसंख्या जेमतेम एक हजारांच्या जवळपास आहे. या दोन्हीही गावांमिळून एका स्वतंत्र ग्रामपंचायतींची आवश्यकता आहे़ या दोन्हीही गावांमिळून एक स्वतंत्र ग्रामपंचायत ‘वाढोणा’ या नावाने स्थापन व्हावी, अशी गावकऱ्यांची अनेक वर्षांपासून मागणी आहे़ त्यासाठी गावकऱ्यांनी शासनाकडे अनेकदा निवेदन, अर्ज, विनंत्या केल्या आहेत. मात्र अद्याप या गावांची फरफट संपलीच नाही.यापूर्वीच्या तत्कालीन युती शासनापासून तर काँग्रेसच्या आघाडी शासनापर्यंत, अनेक मंत्री, संबंधित विभागाचे सचिव, खासदार, आमदार या सर्वांकडे गावकऱ्यांनी स्वतंत्र ग्रामपंचायतीची मागणी केली. अर्ज, विनंत्यांव्दारे आजर्व केले. मात्र ही महत्त्वाची मागणी गेल्या कित्येक वर्षापासून प्रलंबितच आहे़ आता पुन्हा युती शासन सत्तेत आल्याने हे शासन तरी या महत्वाच्या मागणीकडे लक्ष देतील काय, असा संतप्त सवाल वाढोणा (खुर्द) व वाढोणा (बुद्रुक) येथील ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. एकमेकांजवळ असूनही या गावांची फरफट होत आहे. दोन वेगळ्या ठिकाणी त्यांना विविध कागदपत्रे, प्रमाणपत्रे मिळविण्यासाठी हेलपाटे मारावे लागत आहे. सोबतच दोनही गावांच्या विकासालाही ‘ब्रेक’ लागला आहे.ग्रामस्थ शासकीय योजनांपासून वंचितवाढोणा खुर्द व वाढोणा बुदु्रक, या दोन्हीही गावांची लोकसंख्या एक हजारापर्यंत आहे़ या दोनही गावांमिळून एक स्वतंत्र ग्रामपंचायत असणे आवश्यक आहे़ परंतु स्वतंत्र ग्रामपंचायत तर सोडाच, या दोन जुळ्या गावांपैकी एक गाव तीन किलोमीटरवरील धारणा ग्रामपंचायतीला, तर दुसरे गाव १० किलोमीटरवरील घोरदडा गावाला गेले आहे. त्यामुळे या दोनही गावांतील ग्रामस्थ अनेक शासकीय योजनांपासून वंचित आहे. शासन नवीन योजना आणते. त्या योजनांमुळे ग्रामस्थांचे जीवनमान उंचावेल व त्यांना विविध प्रकारच्या सुखसोयी मिळतील, अशी अपेक्षा असते. तथापि वाढोणा (बु़) आणि वाढोणा (खु.) ही दोन्हीही जुळी गावे दोन वेगवेगळ्या ग्रामपंचायतींना जोडली गेल्यामुळे ग्रामस्थांची उपेक्षा होत आहे़