शहरं
Join us  
Trending Stories
1
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
2
अजितदादांच्या अपघातादिवशीच विमान कंपनीला ९ कोटींचे बक्षीस; रोहित पवारांचे खळबळजनक आरोप
3
भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र...
4
Top Marathi News LIVE Updates: "दादांच्या अंत्यविधीच्या दिवशी १६ कोटी दिले"; रोहित पवारांचा 'व्हीएसआर' कंपनीवरून सरकारवर हल्ला
5
गोलsss... पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सिक्कीमच्या तरूणांसोबत खेळला फुटबॉल, PHOTOSची रंगली चर्चा
6
वाढदिवसासाठी Reel तयार करण्याच्या नादात युवकाने भलताच उद्योग केला; शेवटी हातात पडल्या बेड्या
7
Adhar Card : मोठा बदल! आता आधार कार्ड तुमचे वय सिद्ध करणार नाही, तुम्हाला जन्मतारखेचा पुरावा म्हणून 'ही' कागदपत्रे दाखवावी लागणार
8
कलमा वाचता येतो का? विचारले अन् सुरक्षा रक्षकांवर चालवला चाकू; मीरा रोडच्या हल्ल्यात 'लोन वुल्फ'चा संशय
9
Robert Kiyosaki Prediction: रॉबर्ट कियोसाकी यांची २०२६-२७ मध्ये मोठ्या आर्थिक संकटाची भविष्यवाणी; भारतीय गुंतवणूकदारांनी काय करावं?
10
तुमच्या छोट्याशा बाल्कनीला, खिडकीला द्या 'ग्रीन टच'; कमी जागेत बाग फुलवण्याच्या 'मास्टर ट्रिक'
11
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
12
हृदयद्रावक! IPL सामना पाहून घरी परतणाऱ्या २ भावांवर काळाचा घाला; 'हिट अँड रन'मध्ये मृत्यू
13
Mutual Fund Redemption Rules: काय आहे FIFO नियम आणि तो कसा वाचवतो तुमचा टॅक्स? जाणून घ्या डिटेल्स
14
बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने झाला 'त्या' चार जणांचा मृत्यू? पोस्टमार्टेम रिपोर्टमधून समोर आलं खरं कारण
15
एका दुखापतीने संपवलं करियर.. अवघ्या ३०व्या वर्षी क्रिकेटपटूला करावी लागली निवृत्तीची घोषणा
16
Chanakya Niti: समाजात राजासारखा मान हवा? चाणक्यनीतीतल्या 'या' ५ सवयी तुमचं आयुष्य बदलतील!
17
भारत-न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक 'मैत्री'! ५००० भारतीयांना थेट नोकरीची संधी, मोठे फायदे कोणते?
18
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
19
Gold-Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात बदल; पटापट चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K आणि १८K Gold चे नवे दर
20
घरात मोबाइल नेटवर्क मिळणे झाले कठीण; इमारतींना ‘डिजिटल रेटिंग’ देण्याचा ‘ट्राय’चा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

कोविड रुग्णालयात दिवसाला हजार ऑक्सिजन सिलिंडर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 05:00 IST

ऑक्सिजनच्या उपलब्धतेबाबत इतर जिल्ह्यांमध्ये सातत्याने तक्रारी आहेत. गेल्या वर्षभरापासून यवतमाळच्या कोविड रुग्णालयात मागणीप्रमाणे ऑक्सिजन सिलिंडरचा पुरवठा सुरू आहे. सध्या १७ रुग्ण सीपॅकवर तर २१९ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. याशिवाय इतर आजारांच्या रुग्णांनाही ऑक्सिजनची गरज भासते. सर्वसाधारण रुग्णांचा अतिदक्षता उपचार कक्ष, अपघात कक्ष येथे केव्हाही ऑक्सिजनचे गरज भासते. ही सर्व गरज नियंत्रित करण्यासाठी दोन ऑक्सिजन सेंटर उभारण्यात आले आहे.

ठळक मुद्देमागणी झाली दुप्पट : ऑक्सिजनवर आहेत २१९ कोरोना रुग्ण

सुरेंद्र राऊतलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सुपर स्पेशालिटीच्या इमारतीत कोविड हॉस्पिटल सुरू आहे. याशिवाय आयसोलेशन वाॅर्ड, सारी रुग्णांचा वाॅर्ड या सर्वच ठिकाणी ऑक्सिजनची गरज रुग्णांना भासत आहे. दिवसाला एक हजार १४० ऑक्सिजन सिलिंडर लागत आहे. त्यासाठी ५०० कनेक्शन व दोन ऑक्सिजन सेंटर उभारण्यात आले आहे. ऑक्सिजनच्या उपलब्धतेबाबत इतर जिल्ह्यांमध्ये सातत्याने तक्रारी आहेत. गेल्या वर्षभरापासून यवतमाळच्या कोविड रुग्णालयात मागणीप्रमाणे ऑक्सिजन सिलिंडरचा पुरवठा सुरू आहे. सध्या १७ रुग्ण सीपॅकवर तर २१९ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. याशिवाय इतर आजारांच्या रुग्णांनाही ऑक्सिजनची गरज भासते. सर्वसाधारण रुग्णांचा अतिदक्षता उपचार कक्ष, अपघात कक्ष येथे केव्हाही ऑक्सिजनचे गरज भासते. ही सर्व गरज नियंत्रित करण्यासाठी दोन ऑक्सिजन सेंटर उभारण्यात आले आहे. तर ५०० कनेक्शन आहे. एका वेळी ५०० सिलिंडर लावले जातात. तीन शिफ्टमध्ये हे सिलिंडर बदलावावे लागतात. रुग्णांची गरज लक्षात घेऊन ऑक्सिजनचा प्रवाह कमी किंवा जास्त ठेवावा लागतो. कोविडच्या उपचारात ऑक्सिजन हे सर्वात मोठे औषध मानले जाते. त्यामुळे ऑक्सिजन पुरवठ्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे यांनी स्वतंत्र ऑक्सिजन समितीच स्थापन केली आहे. ही समिती पुरवठा आणि वाॅर्डनिहाय त्याचे नियोजन याची देखरेख करते. पूर्वी दिवसाला ५०० ते ६०० ऑक्सिजन सिलिंडर लागत होते. आता ही मागणी दुप्पट झाली आहे. सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या इमारतीत संपूर्ण कोविड रुग्ण उपचारासाठी दाखल आहेत. चार मजल्यापर्यंत ऑक्सिजन पोहोचविण्यासाठी येथे इंटर नॅशनल ओटू कंट्रोल पॅनल बसविले आहे. ही प्रणाली अमेरिकेतून आयात केली असून ऑटोमॅटिक कंट्रोल पॅनलच्या माध्यमातून कार्यान्वित आहे. सप्टेंबर २०२० पासून सातत्याने हे ओटू सेंटर सुरू आहे. त्यात सेकंदाचाही खंड पडलेला नाही. २७ मार्च रोजी रात्री ८.३० वाजता या प्रणालीत बिघाड झाल्याची बाब निदर्शनास आली. ऑक्सिजन समितीच्या सर्व सदस्यांनी स्थानिक तंत्रज्ञांना सोबत घेऊन ऑक्सिजन प्रवाह खंडित होऊ न देता रात्रभर दुरुस्तीचे काम केले. सकाळी ४ वाजेपर्यंत ही दुरुस्ती चालली. नंतर दिल्लीवरून तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या