शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

‘एसटी’च्या स्मार्ट कार्डने ज्येष्ठ नागरिकांच्या प्रवासाला मर्यादा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2019 11:33 IST

वर्षभरात कितीही प्रवास केला तरी अर्धीच तिकीट लागेल, या अलिखित सवलतीला ज्येष्ठ नागरिकांना आता मुकावे लागणार आहे. स्मार्ट कार्ड मिळताच प्रवासाचा हिशेब सुरू होणार आहे.

ठळक मुद्देचार हजारवर फुलस्टॉप बॅलेन्स संपताच फुल तिकीट

विलास गावंडे ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : वर्षभरात कितीही प्रवास केला तरी अर्धीच तिकीट लागेल, या अलिखित सवलतीला ज्येष्ठ नागरिकांना आता मुकावे लागणार आहे. स्मार्ट कार्ड मिळताच प्रवासाचा हिशेब सुरू होणार आहे. चार हजार किलोमीटर संपताच पूर्ण तिकीट काढून प्रवास करावा लागणार आहे. याची सुरुवात काही ठिकाणी झाली आहे.ज्येष्ठ नागरिकांना अर्ध्या तिकिटात वर्षभरात चार हजार किलोमीटरच प्रवास करता येतो. मात्र याची मोजदाद होत नव्हती. आधार कार्ड, मतदान कार्ड या आधारे अर्धे तिकीट दिले जात होते. या मर्यादेपासून सवलत घेणारेही अनभिज्ञ होते. आता एसटी महामंडळ सवलत घेणाऱ्यांना स्मार्ट कार्ड देत आहे. १ एप्रिल ते ३१ मार्च या एक वर्षाच्या कालावधीसाठी स्मार्ट कार्डची मुदत राहणार आहे. मुदत संपताच प्रत्येक वर्षी नुतनीकरण करावे लागणार आहे.ज्येष्ठ नागरिकाचे स्मार्ट कार्ड मशिनद्वारे स्वाईप केले जाणार आहे. याद्वारे कार्डधारकाने नेमका किती प्रवास केला याची माहिती वाहकाला मिळणार आहे. (उदा. प्रवास सवलत ४००० किलोमीटर. नागपूर-अमरावती प्रवास १५० किलोमीटर. चार हजारमधून १५० वजा. उरले ३९५० किलोमीटर). असाच हिशेब प्रत्येक प्रवासात होणार आहे. चार हजार कि़मी. संपले रे संपले की वाहक पूर्ण तिकीट फाडणार आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकाला आता आपण किती प्रवास केला, याची मोजदाद करावी लागणार आहे.स्मार्ट कार्डची आगारनिहाय नोंदणी केली जात आहे. ज्यांच्याकडे स्मार्ट कार्ड नाही त्यांच्याकडील आधारकार्ड पाहून त्यांना अर्ध्या तिकिटाद्वारे प्रवास करू दिला जाणार आहे. पुढील काळात मात्र अर्ध्या तिकिटासाठी ‘आधार’ तुटणार आहे. स्मार्ट कार्ड योजना लागू झाल्याने प्रवासादरम्यान होणारी बोगसगिरी आणि महामंडळाचे होणार आर्थिक नुकसान थांबणार आहे.स्मार्ट कार्डचे फायदे अधिकज्येष्ठ नागरिकांना स्मार्ट कार्ड दिले जाणार असल्याने आधार कार्ड, मतदान कार्डातून सुटका होणार आहे. स्मार्ट कार्ड रिचार्जची सोय आहे. त्यामुळे प्रवासात सोबत पैसे बाळगण्याची गरज नाही. स्मार्ट कार्ड तयार करण्यासाठी ज्येष्ठांना ५५ रुपये शुल्क आकारले जाणार आहे. आॅनलाईन नोंदणीनंतर कार्ड आधार कार्डशी लिंक केले जाते. त्यानंतर दहा ते १५ दिवसात संबंधितांना कार्ड दिले जाते.

टॅग्स :state transportएसटी