शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

गंभीर गुन्ह्यातील शिक्षेचे प्रमाण तिपटीने वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2020 5:00 AM

गेल्या तीन महिन्यांपासून जिल्ह्यात लॉकडाऊन आहे. या काळात संचारबंदीचे उल्लंघन करणाºया व्यक्तींविरुद्ध कलम १८८ अन्वये गुन्हे नोंदविले गेले. ही प्रकरणे प्रलंबित न ठेवता लगेच न्यायालयात सादर केली गेली. न्यायालयांनीही तातडीने हे खटले निकाली काढले. त्यात तब्बल ३७४ जणांना शिक्षा झाली. दंड म्हणून त्यांच्याकडून चार लाख ९५ हजार ४०० रुपयांची रक्कम वसूल केली गेली.

ठळक मुद्देयवतमाळ जिल्हा : शिक्षेचा दर ५२.८५ टक्के, स्थानिक गुन्ह्यांमध्ये ३८.९० टक्के शिक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : काही वर्षांपूर्वी अवघा १५ टक्के असलेला गंभीर गुन्ह्यांच्या न्यायालयीन खटल्यातील शिक्षेचा दर आता तिपटीने वाढून ५२.८५ टक्क्यावर पोहोचला आहे. पोलिसांचा काटेकोर तपास व पंच-साक्षीदारांच्या पाठपुराव्याचे हे फलित मानले जाते.एकेकाळी जिल्ह्यातील गंभीर गुन्ह्यात शिक्षेचे प्रमाण अवघे ५ टक्के होते. नंतर एसडीपीओ स्तरावर विधी अधिकारी व प्रत्येक न्यायालयामध्ये पैरवी अधिकारी नियुक्त केले गेले. त्यामुळे २०१५ मध्ये भादंविच्या गुन्ह्यातील शिक्षेचे प्रमाण १५.४५ टक्क्यांवर पोहोचले. त्यात प्रत्येक वर्षी वाढ होत गेली. २०२० मध्ये ३० जून अखेर हे प्रमाण ५२.८५ टक्के झाले. १ जून २०१७ ला यवतमाळ येथील जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून रुजू झालेल्या एम. राज कुमार यांनी न्यायालयीन खटल्यांमध्ये शिक्षेचे प्रमाण वाढविण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. त्यासाठी प्रत्येक आठवड्याला आढावा घेतला जातो, या आठवड्यात कोणती केस बोर्डावर लागणार, त्यातील गुन्हा साबित होण्याच्या दृष्टीने महत्वाचे पैलू काय, पंच-साक्षीदार कोण याच्यावर फोकस निर्माण केला जातो. महत्वपूर्ण पंच-साक्षीदाराला विश्वासात घेऊन न्यायालयातील उलट तपासणीच्या दृष्टीने भक्कम तयारी करून घेतली जाते. दाखल होणाऱ्या नव्या गुन्ह्यांमध्ये पंचनामा करताना काही त्रुटी राहणार नाही, याची खबरदारी घेतली जाते. स्थळ पंचनाम्याच्यावेळी तेथे सापडणाºया वस्तू रेकॉर्डवर घेऊन त्या माध्यमातून गुन्ह्याचा हेतू व आरोपीपर्यंत कनेक्टीव्हीटी निर्माण केली जाते. या साखळीतूनच गुन्हे सिद्ध होणे व त्यात न्यायालयाकडून शिक्षा ठोठावली जाण्याचे प्रमाण वाढले आहे. बोर्डावर आलेल्या जुन्या खटल्यांमध्ये सर्वाधिक फोकस पंच-साक्षीदारावर निर्माण केला जातो. पोलिसांच्या या सर्व परिश्रमांमुळेच २०१७ ला १९.९६ टक्के असलेले गंभीर गुन्ह्यातील शिक्षेचे प्रमाण आता तब्बल ५२.८५ टक्क्यावर पोहोचले आहे. गेल्या तीन वर्षात दाखल झालेल्या गुन्ह्यांमध्ये भक्कम तपास करून दोषारोपपत्रे न्यायालयात सादर केली गेल्याने पुढील काही वर्ष गंभीर गुन्ह्यांमध्ये शिक्षेचे प्रमाण वाढतच राहणार असल्याचे सांगण्यात आले.आयपीसी वगळता आर्म्स अ‍ॅक्ट, दारू जुगारावरील कारवाई, इसी अ‍ॅक्ट या सारख्या विशेष स्थानिक कायद्यान्वये (एसएलएल) दाखल गुन्ह्यांमध्येसुद्धा २०१५ ला १८.८६ टक्के असलेले शिक्षेचे प्रमाण आता दुप्पटीने वाढून३८.९० टक्क्यावर पोहोचले आहे.लॉकडाऊन तोडणाºया ३७४ जणांना शिक्षागेल्या तीन महिन्यांपासून जिल्ह्यात लॉकडाऊन आहे. या काळात संचारबंदीचे उल्लंघन करणाºया व्यक्तींविरुद्ध कलम १८८ अन्वये गुन्हे नोंदविले गेले. ही प्रकरणे प्रलंबित न ठेवता लगेच न्यायालयात सादर केली गेली. न्यायालयांनीही तातडीने हे खटले निकाली काढले. त्यात तब्बल ३७४ जणांना शिक्षा झाली. दंड म्हणून त्यांच्याकडून चार लाख ९५ हजार ४०० रुपयांची रक्कम वसूल केली गेली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस