शहरं
Join us  
Trending Stories
1
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
2
अजितदादांच्या अपघातादिवशीच विमान कंपनीला ९ कोटींचे बक्षीस; रोहित पवारांचे खळबळजनक आरोप
3
भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र...
4
Top Marathi News LIVE Updates: "दादांच्या अंत्यविधीच्या दिवशी १६ कोटी दिले"; रोहित पवारांचा 'व्हीएसआर' कंपनीवरून सरकारवर हल्ला
5
गोलsss... पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सिक्कीमच्या तरूणांसोबत खेळला फुटबॉल, PHOTOSची रंगली चर्चा
6
वाढदिवसासाठी Reel तयार करण्याच्या नादात युवकाने भलताच उद्योग केला; शेवटी हातात पडल्या बेड्या
7
Adhar Card : मोठा बदल! आता आधार कार्ड तुमचे वय सिद्ध करणार नाही, तुम्हाला जन्मतारखेचा पुरावा म्हणून 'ही' कागदपत्रे दाखवावी लागणार
8
कलमा वाचता येतो का? विचारले अन् सुरक्षा रक्षकांवर चालवला चाकू; मीरा रोडच्या हल्ल्यात 'लोन वुल्फ'चा संशय
9
Robert Kiyosaki Prediction: रॉबर्ट कियोसाकी यांची २०२६-२७ मध्ये मोठ्या आर्थिक संकटाची भविष्यवाणी; भारतीय गुंतवणूकदारांनी काय करावं?
10
तुमच्या छोट्याशा बाल्कनीला, खिडकीला द्या 'ग्रीन टच'; कमी जागेत बाग फुलवण्याच्या 'मास्टर ट्रिक'
11
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
12
हृदयद्रावक! IPL सामना पाहून घरी परतणाऱ्या २ भावांवर काळाचा घाला; 'हिट अँड रन'मध्ये मृत्यू
13
Mutual Fund Redemption Rules: काय आहे FIFO नियम आणि तो कसा वाचवतो तुमचा टॅक्स? जाणून घ्या डिटेल्स
14
बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने झाला 'त्या' चार जणांचा मृत्यू? पोस्टमार्टेम रिपोर्टमधून समोर आलं खरं कारण
15
एका दुखापतीने संपवलं करियर.. अवघ्या ३०व्या वर्षी क्रिकेटपटूला करावी लागली निवृत्तीची घोषणा
16
Chanakya Niti: समाजात राजासारखा मान हवा? चाणक्यनीतीतल्या 'या' ५ सवयी तुमचं आयुष्य बदलतील!
17
भारत-न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक 'मैत्री'! ५००० भारतीयांना थेट नोकरीची संधी, मोठे फायदे कोणते?
18
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
19
Gold-Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात बदल; पटापट चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K आणि १८K Gold चे नवे दर
20
घरात मोबाइल नेटवर्क मिळणे झाले कठीण; इमारतींना ‘डिजिटल रेटिंग’ देण्याचा ‘ट्राय’चा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

समायोजन टाळण्यासाठी शिक्षकांचा असाही फंडा

By admin | Updated: May 14, 2014 02:03 IST

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी शिक्षकांचे कामाचे दिवस वाढविल्याच्या घटनेची शाई वाळते न वाळते तोच आता समुपदेशनाच्या निमित्ताने अनेक भानगडी समोर येत आहेत.

यवतमाळ : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकार्‍यांनी शिक्षकांचे कामाचे दिवस वाढविल्याच्या घटनेची शाई वाळते न वाळते तोच आता समुपदेशनाच्या निमित्ताने अनेक भानगडी समोर येत आहेत. आरटीईनुसार वीसपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांवर गंडांतर येत आहे. यामुळे शिक्षकांसमोर अतिरिक्त होण्याचा पेच निर्माण झाला आहे. यातून मार्ग काढण्यासाठी आता एखाद्या संघटनेचे उपाध्यक्षपद आणून बदली टाळण्याचा प्रयत्न होत असल्याची बाब उघड झाली आहे.

नेर पंचायत समिती अंतर्गत येणार्‍या सोनवाढोणा येथील शाळेवर हा प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे प्रतीमा मिरासे या शिक्षिके वर अन्याय झाला आहे.

सोनवाढोणा येथील उच्च प्राथमिक मराठी शाळेतील दोन शिक्षक पटसंख्येमुळे अतिरिक्त ठरलेत. त्यामुळे आपले रोडवरचे गांव हातातून निघून जाईल, या भीतीपोटी शिक्षक संघटनेचे उपाध्यक्ष असल्याचा फंडा वापरण्यात आला. या शाळेवरील संगीता मस्के आणि स्मिता तिडके या शिक्षिका सेवाज्येष्ठतेनुसार बदलीपात्र होत्या. स्मिता तिडके या गेल्या सहा महिन्यांपासून पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेच्या उपाध्यक्षपदावर कायम आहे. त्यांनी उपाध्यक्ष असल्याचे पत्र यापूर्वीच जोडले आहे. मात्र काही जणांनी ऐनवेळेवर ुउपाध्यक्ष पदाचे पत्र जोडल्याची चर्चा आहे. उपाध्यक्षाची बदली करता येत नाही, ही बाब लक्षात येताच इतरही शिक्षकांनी बदलीच्या कचाट्यातून वाचण्यासाठी शिक्षक संघटनेचा उपाध्यक्ष असल्याचे पत्र आणले.

या सार्‍या प्रकाराचा फटका प्रतीमा मिरासे यांना बसला. समायोजनासाठी ऐनवेळी त्यांना नेर पंचायत समितीमध्ये बोलविण्यात आले. ध्यानीमनी नसतांना समायोजनासाठी बोलविण्यात आल्यामुळे त्या संभ्रमात पडल्यात. कुठलेही पत्र न देता त्यांना फोन करून बोलविण्यात आल्यामुळे त्यांना समायोजनाचा नाहक फटका बसला आहे. प्रतीमा मिरासे यांना देण्यात येणारे गाव सोयीचे नसल्यामुळे त्यांनी मात्र गाव घेण्यास नकार दिला. या सार्‍या प्रकारामुळे नेर पंचायत समितीच्या शिक्षण विभागात शिक्षक बदली टाळण्यासाठी काय अफलातून ‘आयडिया’ वापरतात, याचा पुरावा मिळाला आहे.

नेर पंचायत समिती अंतर्गत ११ जणांचे समायोजन करण्यात आले. समायोजनात आपल्याला सोयीचे गाव मिळाले नाही तर त्रास होईल, यामुळे संघटनेचा उपाध्यक्ष असल्याचे पत्र जोडून स्वत:वरील बदलीचे संकट टाळण्यात बदलीपात्र शिक्षकांना तूर्तास यश आले आहे. या सार्‍या प्रकारामुळे मात्र सोनवाढोणा येथील शाळेवरील शिक्षिका प्रतीमा मिरासे यांना नाहक बदलीला सामोरे जावे लागले. मागील वर्षी अपंगाचे प्रमाणपत्र जोडून बदल्या टाळण्याचा प्रकार जिल्हा परिषदेमध्ये घडला होता. (शहर प्रतिनिधी)