शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
4
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
5
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
6
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
7
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
8
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
9
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
10
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
11
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
12
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
13
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
14
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
15
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
16
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
17
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
18
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
19
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
20
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

पोस्टल ग्राऊंडच्या दुकानांचे डिपॉझिट १३ लाखांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2015 03:53 IST

महिला बचत गट, लघु उद्योग समूह यांच्या साहित्याला मार्केट उपलब्ध व्हावे या हेतूने पोस्टल ग्राऊंडवर दुकान गाळे

यवतमाळ : महिला बचत गट, लघु उद्योग समूह यांच्या साहित्याला मार्केट उपलब्ध व्हावे या हेतूने पोस्टल ग्राऊंडवर दुकान गाळे बांधण्यात आले. परंतु त्यासाठी तब्बल पाच ते १३ लाखांपर्यंत डिपॉझिट (अनामत रक्कम) ठेवण्याची प्रशासनाची तयारी बघता गावागावांतील महिला बचत गट यातून आत्ताच बाद होण्याची चिन्हे दिसू लागली आहे. जिल्हा विकास निधीतून पोस्टल ग्राऊंडचा विकास केला जात आहे. याच ग्राऊंडवर दरवर्षी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, आत्मा व अन्य सामाजिक संस्थांमार्फत महिला बचत गटाद्वारे निर्मित साहित्याचे प्रदर्शन भरविले जाते. तेथेच साहित्याची विक्री केली जाते. शिवाय त्यांना या प्रदर्शनातून मार्गदर्शनही केले जाते. वर्षातून केवळ तीन दिवस प्रदर्शनात आपले साहित्य विक्रीसाठी ठेवणाऱ्या या महिलांना कायमस्वरूपी बाजारपेठ उपलब्ध व्हावी या उदात्त हेतूने त्याच पोस्टल ग्राऊंडवर दुकानांचे बांधकाम करण्याचा निर्णय घेतला गेला होता. त्यानुसार किमान ९० चौरस फूट आणि कमाल २५० चौरस फूट आकाराची २६ दुकाने बांधण्यात आली. सुरुवातीला या दुकानांना नगररचना विभागाची परवानगीच नव्हती. मात्र ही बाब जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. त्यानंतर कुठे नगररचना विभागाने परवानगी दिली. ही दुकाने बांधून तयार आहे. मात्र तेथे प्रसाधनगृहाची कोणतीही व्यवस्था नाही. उपविभागीय महसूल अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली या दुकानांसाठी समिती आहे. नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनाही या समितीत स्थान देण्यात आले आहे. नगररचना विभागाने या दुकानांचे भाडे आणि अनामत रक्कम किती असेल याचा प्रस्ताव तयार केला आहे. त्यानुसार जास्तीत जास्त १३ लाख आणि कमीत कमी साडेपाच लाख रुपये अनामत रक्कम या दुकानांसाठी घेण्याचा प्रस्ताव आहे. ९० चौरस फुटाच्या दुकानासाठी पाच लाख रुपये डिपॉझिट आणि मासिक ९५० रुपये भाडे प्रस्तावित आहे. तर आकाराने सर्वात मोठे असलेल्या २६० चौरस फुट दुकानासाठी १३ लाख २५ हजार रुपये अनामत रक्कम ठेवण्याचा प्रस्ताव आहे. मात्र त्याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. विशेष असे या दुकानांसाठी फिल्डींग लावून असलेल्या व्यापाऱ्यांची शहरात आधीच मोठमोठ्ठाली दुकाने आहेत. गोरगरीब बचतगटाद्वारे निर्मित साहित्याला मार्केट मिळावे या हेतूने ही दुकाने काढली गेली असली तरी अनामत रक्कमेचा फुगविलेला आकडा पाहता त्या हेतूलाच मुठमाती दिली जात असल्याचे दिसून येते. २६ पैकी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व अपंग यांच्यासाठी प्रत्येकी एक दुकान आरक्षित ठेवले गेले आहे. या सर्व दुकानांची लवकरच बोली लागणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)४आकाराने अगदी लहान असलेल्या या दुकानांसाठीच्या अनामत रकमेचा आकडा पाहता गोरगरीब बचत गटांना या दुकानांपासून कोसोदूर ठेवण्याचा डाव असल्याचे दिसून येते. ५० हजार रुपये वार्षिक उलाढाल असलेले महिला बचतगट एवढे डिपॉझिट आणणार कोठून हा प्रश्न आहे. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी अगदी मोक्याच्या जागेवर असलेली ही दुकाने व्यापाऱ्यांच्या घशात जाण्याची शक्यता आहे.