शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघातादिवशीच विमान कंपनीला ९ कोटींचे बक्षीस; रोहित पवारांचे खळबळजनक आरोप
2
भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र...
3
Top Marathi News LIVE Updates: "दादांच्या अंत्यविधीच्या दिवशी १६ कोटी दिले"; रोहित पवारांचा 'व्हीएसआर' कंपनीवरून सरकारवर हल्ला
4
Adhar Card : मोठा बदल! आता आधार कार्ड तुमचे वय सिद्ध करणार नाही, तुम्हाला जन्मतारखेचा पुरावा म्हणून 'ही' कागदपत्रे दाखवावी लागणार
5
कलमा वाचता येतो का? विचारले अन् सुरक्षा रक्षकांवर चालवला चाकू; मीरा रोडच्या हल्ल्यात 'लोन वुल्फ'चा संशय
6
Robert Kiyosaki Prediction: रॉबर्ट कियोसाकी यांची २०२६-२७ मध्ये मोठ्या आर्थिक संकटाची भविष्यवाणी; भारतीय गुंतवणूकदारांनी काय करावं?
7
तुमच्या छोट्याशा बाल्कनीला, खिडकीला द्या 'ग्रीन टच'; कमी जागेत बाग फुलवण्याच्या 'मास्टर ट्रिक'
8
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
9
हृदयद्रावक! IPL सामना पाहून घरी परतणाऱ्या २ भावांवर काळाचा घाला; 'हिट अँड रन'मध्ये मृत्यू
10
Mutual Fund Redemption Rules: काय आहे FIFO नियम आणि तो कसा वाचवतो तुमचा टॅक्स? जाणून घ्या डिटेल्स
11
बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने झाला 'त्या' चार जणांचा मृत्यू? पोस्टमार्टेम रिपोर्टमधून समोर आलं खरं कारण
12
एका दुखापतीने संपवलं करियर.. अवघ्या ३०व्या वर्षी क्रिकेटपटूला करावी लागली निवृत्तीची घोषणा
13
Chanakya Niti: समाजात राजासारखा मान हवा? चाणक्यनीतीतल्या 'या' ५ सवयी तुमचं आयुष्य बदलतील!
14
भारत-न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक 'मैत्री'! ५००० भारतीयांना थेट नोकरीची संधी, मोठे फायदे कोणते?
15
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
16
Gold-Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात बदल; पटापट चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K आणि १८K Gold चे नवे दर
17
घरात मोबाइल नेटवर्क मिळणे झाले कठीण; इमारतींना ‘डिजिटल रेटिंग’ देण्याचा ‘ट्राय’चा निर्णय
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातने पीडितेला दिली दैवी शक्तीने मुलांना ठार मारण्याची धमकी
19
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
20
TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन
Daily Top 2Weekly Top 5

सात लाख मतदारांची मतदानाकडे पाठ

By admin | Updated: October 18, 2014 23:00 IST

मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य आहे, ते टाळू नये, अशी जनजागृती प्रशासनाने करूनही त्याचा मतदारांवर तेवढा प्रभाव पडला नाही. कारण ६ लाख ९२ हजार ६२ मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरविली.

यवतमाळ : मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य आहे, ते टाळू नये, अशी जनजागृती प्रशासनाने करूनही त्याचा मतदारांवर तेवढा प्रभाव पडला नाही. कारण ६ लाख ९२ हजार ६२ मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरविली. मतदान सक्तीचे करण्याबाबत सर्वच स्तरातून मागणी होत आहे. त्यासाठी सरकारवर जनतेतून दबाव वाढविला जात आहे. मतदान केल्याशिवाय शासनाच्या कोणत्याही सोईसुविधा दिल्या जाऊ नये, अशीही मागणी आहे. मतदानाच्या सक्तीचा सरकारने अद्याप विचार केला नसला तरी मतदारांमध्ये मतदानाबाबतची जनजागृती करण्याचा पुरेपूर प्रयत्न सरकार आणि प्रशासनाकडून या निवडणुकीत केला गेला. विविध वाहिन्या आणि माध्यमांद्वारे आपले मत कसे अमूल्य आहे, हे पटवून देण्याचा प्रयत्न झाला. प्रत्येक जिल्ह्यात मतदारसंघ आणि गावागावात निवडणूक विभागाने मतदानाबाबत जनजागृती केली. त्यासाठी पथनाट्य, लोकगीतांचा आधार घेतला गेला. त्यामुळे गतवेळेपेक्षा मतदानाची टक्केवारी निश्चितच वाढली. मात्र अपेक्षेनुसार त्यात यश आले नाही. मतदारांमधील निरुत्साह कायम दिसला. त्यातही शहरी मतदारांची भूमिका ‘आम्हाला त्याचे काय’ अशीच पहायला मिळाली. त्यामुळेच यवतमाळ शहरातील मतदानाची टक्केवारी अवघी ५८.६७ एवढी नोंदविली गेली. या उलट जिल्ह्यात सर्वाधिक मतदान हे वणी मतदारसंघात ७२.६७ टक्के एवढे नोंदविले गेले. अन्य मतदारसंघात ६७ ते ६९ टक्के मतदान झाले. पुसदमध्ये ही टक्केवारी ६१.२३ अशी नोंद झाली. संपूर्ण जिल्ह्याचा विचार केल्यास सुमारे २० लाख मतदारांपैकी तब्बल सात लाख मतदारांनी मतदानाच्या राष्ट्रीय कर्तव्याकडे पाठ फिरविल्याचे चित्र पाहायला मिळाले. यवतमाळात सर्वाधिक १ लाख ४५ हजार, पुसद १ लाख नऊ हजार, दिग्रस ९५ हजार, उमरखेड ९१ हजार, आर्णी ८८ हजार, राळेगाव ८७ हजार तर वणीत ७३ हजार मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरविली. शासनाने मतदानासाठी घोषित केलेल्या सुटीचा वापर मतदारांनी एन्जॉयसाठी केला. २५ वर्षानंतर पहिल्यांदा यावेळी निवडणुकीमध्ये अनेक पर्याय उपलब्ध झाले होते. त्यानंतरही मतदान टाळले गेले. यावेळची टक्केवारी पाहता मतदानाच्या सक्तीची मागणी पुन्हा जोर धरत आहे. (जिल्हा प्रतिनिधी)