शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
6
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
7
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
8
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
9
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
10
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
11
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
12
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
13
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
14
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
15
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
16
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
17
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
18
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
19
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
20
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील साडेतीन लाख शेतकऱ्यांना विम्याचा ठेंगा

By admin | Updated: June 5, 2017 01:14 IST

गेल्यावर्षी मोठा गाजावाजा करून पंतप्रधान पीक विमा योजना आली. शेतकऱ्यांना यातून विम्याची भरीव आर्थिक मदत मिळेल, ...

सहा तालुके पात्र : केंद्राची महत्त्वाकांक्षी योजना कुचकामीरूपेश उत्तरवार। लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गेल्यावर्षी मोठा गाजावाजा करून पंतप्रधान पीक विमा योजना आली. शेतकऱ्यांना यातून विम्याची भरीव आर्थिक मदत मिळेल, असे चित्र उभे करण्यात आले. प्रत्यक्षात जिल्ह्यातील १६ तालुक्यांपैकी दहा तालुक्यातील तब्बल साडेतीन लाख शेतकऱ्यांना या विम्याने ठेंगा दाखविला आहे. परिणामी ही योजना फुसका बार ठरली आहे.पंतप्रधान पीक विमा योजनेत गेल्यावर्षी तीन लाख ९७ हजार ९३० शेतकऱ्यांनी तीन लाख ६१ हजार ६६८ हेक्टरवरील पिकांचा विमा उतरविला. यात सर्वाधिक क्षेत्र कापसाचे होते. त्या खालोखाल सोयाबीन, तूर, मूग, उडीद आणि ज्वारीच्या क्षेत्राची नोंद होती. पंतप्रधान पीक विमा योजनेत शेतकऱ्यांना नवीन निकषानुसार मदत मिळणार होती. त्यामुळे प्रत्येक विमाधारकाला मदत मिळेल, अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात उलटेच घडले. विमा कंपनीने तीन लाख ५९ हजार शेतकरी मदतीसाठी अपात्र ठरविले. केवळ सहा तालुक्यातील ३८ हजार ८३१ शेतकरी मदतीस पात्र ठरले. या पात्र शेतकऱ्यांना २३ कोटी सात लाख ३१ हजार २५३ रूपयांची मदत दिली जाणार आहे. आश्वासनाच्या तुलनेत मिळालेली रक्कम शेतकऱ्यांच्या अपेक्षा भंग करणारी आहे. यामुळे ही योजना शेतकऱ्याऐवजी विमा कंपनीच्याच लाभाची ठरली आहे.नुकसानग्रस्तांचा फोन उचललाच नाहीपंतप्रधान पीक विमा योजनेचा अर्ज भरताना काही खास कंपन्यांना अर्जाच्या छपाईचे कंत्राट दिले होते. यामुळे शेतकऱ्यांना उशिरापर्यंत अर्जही मिळाले नाही. त्या अर्जावर एक दूरध्वनी क्रमांक देण्यात आला होता. नुकसान झाल्यानंतर २४ तासात त्यावर संपर्क करावा, तत्काळ मदत मिळेल, असेही नमूद होते. मात्र शेतकऱ्यांनी केलेला दूरध्वनीच उचलला जात नव्हता. यामुळे विम्याबाबत प्रश्नचिन्ह होते. मदतीच्या घोषणेमुळे पंतप्रधान पीक विमा योजनेचा दावा किती फोल होता, हेच आता उघड झाले आहे.सहा तालुक्यातील मोजकाच परिसरजिल्ह्यातील १०१ मंडळांपैकी मोजक्याच मंडळाला पीक विमा मंजूर झाला. यात प्रत्येक तालुका व मंडळात वेगवेगळ्या पिकांना मदत जाहीर झाली. यात आर्णी, दारव्हा, बाभूळगाव, पुसद, वणी आणि झरी या सहा तालुक्यातील मोजक्याच मंडळातील शेतकऱ्यांना विम्याची भरपाई मिळणार आहे.