शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयांनंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
2
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
4
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
5
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
6
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
7
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
8
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
9
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
10
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
11
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
12
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
13
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
14
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
15
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
16
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
17
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
18
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
19
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
20
थलपती विजयच्या ड्रायव्हरचा मुलगा झाला आमदार! तिकीट मिळालं तेव्हा स्टेजवर ढसाढसा रडला होता...
Daily Top 2Weekly Top 5

कळंब नगर पंचायतीसाठी पक्षीय मोर्चेबांधणी

By admin | Updated: October 5, 2015 02:35 IST

नगर पंचायत निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. चार प्रमुख पक्षात होणारी निवडणूक सर्वांसाठी अस्तित्वाचा ...

कळंब : नगर पंचायत निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. चार प्रमुख पक्षात होणारी निवडणूक सर्वांसाठी अस्तित्वाचा विषय ठरणारी राहणार आहे. त्यामुळे सर्वच जण शक्तीप्रदर्शनाच्या जोरदार तयारीत आहे. या नगर पंचायतीची निवडणूक १ नोव्हेंबर रोजी होत आहे.काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजपा या चार प्रमुख पक्षांनी निवडणुकीच्या आखाड्यात दंड थोपटले आहे. विशेष म्हणजे पूर्वीचे मित्रपक्ष स्वतंत्रपणे आपली शक्ती अजमावित आहे. पक्षाचे उमेदवार जवळजवळ निश्चित झाले आहे. त्यावर अखरेचा हात फिरविला जात आहे. असे असले तरी, काँग्रेस व भाजपाच्या उमेदवारांत अजूनही संभ्रमावस्था असल्याचे दिसून येते. संभ्रमाचा हा टेम्पो पुढील चार दिवस असाच कायम राहणार आहे. नामांकन भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत सर्वांना खेळवत ठेवले जाईल. कारण कार्यकर्ता नाराज होऊ नये किंवा त्याने बंडखोरीचा पवित्रा घेऊ नये, यासाठी ही भूमिका घेतली जात आहे.प्रस्थापित पक्ष म्हणून राष्ट्रवादी व काँग्रेसची ओळख आहे. यापूर्वी या दोन पक्षातच एकासएक टक्कर असायची. तालुक्यात त्यांनीच आतापर्यंत सत्तेचा उपभोग घेतला. निवडणुकीत उभे करण्यासाठी शिवसेना व भाजपाला उमेदवारही सापडायचे नाही. परंतु यावेळची स्थिती वेगळी आहे. या दोन्ही पक्षात उमेदवारी मिळविण्यासाठी भाऊगर्दी पाहायला मिळत आहे. त्यामुळे या निवडणुकीत प्रस्थापित पक्षाविरुध्द सेना-भाजपाचे चांगलेच आव्हान उभे ठाकणार आहे. १७ जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत चार प्रमुख पक्षासह बीएसपी, एमआयएमचेही उमेदवार राहणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे या पक्षाच्या उमेदवारांचा मोठा फटका कोणाला बसतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (तालुका प्रतिनिधी)