शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
5
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
6
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
7
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
8
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
9
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
10
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
11
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
12
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
13
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
14
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
15
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
16
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
17
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
18
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
19
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
20
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

देशभरातील वीज कर्मचारी आज काळा दिवस पाळणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2020 16:52 IST

वीज बिल कायदा आणि ऊर्जा क्षेत्रातील कंपन्यांचे खासगीकरण करण्याचे धोरण याचा महाराष्ट्र व देशभरातील ऊर्जा क्षेत्रातील कर्मचा-यांनी तीव्र विरोध केला आहे.

यवतमाळ : केंद्र सरकारने जाहीर केलेल्या वीज बिल कायदा आणि ऊर्जा क्षेत्रातील कंपन्यांचे खासगीकरण करण्याचे धोरण याचा महाराष्ट्र व देशभरातील ऊर्जा क्षेत्रातील कर्मचा-यांनी तीव्र विरोध केला आहे. हा विरोध सरकारपर्यंत पोहोचविण्यासाठी अभियंते आणि कर्मचारी १ जून रोजी काळादिवस पाळत काळीफित लावून काम करणार आहे.शिवाय नॉन रेड झोन जिल्ह्यात निषेध सभाही घेतल्या जाणार आहे. केंद्र सरकारने १७ एप्रिलला वीज बिल कायदा आणि खासगीकरणाचे धोरण जाहीर केले. तेव्हापासूनच कर्मचा-यांमध्ये असंतोष खदखदत आहे. या धोरणामुळे देशभरातील शेतकरी, औद्योगिक ग्राहक व सर्वसामान्य गरीब नागरिकांना संकटाचा सामना करावा लागणार आहे. राज्य सरकारच्या अधिकाराला कात्री लागणार आहे. गरीब शेतक-यांना वीज दरात मिळणा-या सर्व सबसिडी बंद होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग व स्टेट लोड डिस्पॅच सेंटरचे सर्व अधिकारही केंद्र सरकारकडे जाणार आहे. हे धोरण फक्त खासगी कंपन्यांना पोषक आहे. कोरोना व लॉकडाऊनच्या काळात कर्मचारी आंदोलन करू शकणार नाही, असा विचार करून सरकारने हे धोरण घाईघाईने आणले आहे. केंद्रशासित प्रदेशातील वीज वितरण कंपन्यांचे खासगीकरण करण्याचे आदेशसुद्धा दिल्याचे समजते. वास्तविक या धोरणाबद्दल तक्रारी, हरकती दाखल करण्यासाठी ५ जूनपर्यंत मुदत आहे. अनेक राज्य सरकारतर्फे विरोध असूनसुद्धा केंद्र सरकार या धोरणाबाबत घाई करीत आहे. त्यामुळे सर्व ऊर्जा क्षेत्रात काम करणारे कर्मचारी आणि अभियंत्यांमध्ये रोष निर्माण झाला आहे. आंदोलनाची पहिली पायरी म्हणून १ जून रोजी काळ्याफिती लावून काम केले जाईल. केंद्राच्या या धोरणाला राज्याने विरोध करावा, असे आवाहन करणारे पत्र सबॉर्डिनेट इंजिनिअर्स असोसिएशनतर्फे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्र्यांना पाठविले आहे. सर्व खासदार आणि पक्ष प्रमुखांनाही आवाहन केले जाणार आहे. या आंदोलनात सर्व सामाजिक संस्था आणि राजकीय पक्षांनी सहभागी होण्याचे आवाहन सबॉर्डिनेट इंजिनिअर्स असोसिएशनचे सरचिटणीस संजय ठाकूर, जिल्हा सहसचिव प्रकाश कोळसे यांनी केले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस