शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
6
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
7
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
8
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
9
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
10
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
11
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
12
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
13
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
14
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
15
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
16
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
17
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
18
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
19
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
20
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात दूरदर्शनच्या मराठी वाहिनीचेच प्रक्षेपण; हिंदी प्रक्षेपण बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2020 23:00 IST

केंद्र सरकारच्या प्रसार भारती मंत्रालयांतर्गत येणाऱ्या दूरदर्शनचे अनेक लघु प्रक्षेपण केंद्र बंद होणार आहे. काही केंद्रांवरून आता केवळ दूरदर्शनच्या मराठी वाहिनीचेच प्रक्षेपण केले जाणार असून हिंदी वाहिनीचे प्रसारण १५ जुलैपासून बंद होणार आहे.

ठळक मुद्दे१५ जुलैपासून होणार अंमलबजावणी

प्रकाश लामणे ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : केंद्र सरकारच्या प्रसार भारती मंत्रालयांतर्गत येणाऱ्या दूरदर्शनचे अनेक लघु प्रक्षेपण केंद्र बंद होणार आहे. काही केंद्रांवरून आता केवळ दूरदर्शनच्या मराठी वाहिनीचेच प्रक्षेपण केले जाणार असून हिंदी वाहिनीचे प्रसारण १५ जुलैपासून बंद होणार आहे.प्रसार भारतीअंतर्गत राज्यात दूरदर्शनची लघु प्रक्षेपण केंद्रे कार्यरत आहे. प्रसार भारतीच्या नांदेड येथील दूरदर्शन केंद्रांतर्गत येणाºया पुसद येथील लघु प्रक्षेपण केंद्रावरून येत्या १५ जुलैपासून राष्ट्रीय हिंदी वाहिनीचे प्रसारण बंद केले जाणार आहे. यापुढे केवळ या लघु केंद्रावरून मराठी (प्रादेशिक) वाहिनीचेच प्रसारण सुरू राहणार असल्याची माहिती येथील लघु प्रक्षेपण केंद्राचे सहायक अभियंता एस.डी. बनसोड यांनी दिली.प्रसार भारतीअंतर्गत राज्यात २१ लघु प्रक्षेपण केंद्र कार्यरत आहे. त्यापैकी नांदेड अनुरक्षण केंद्रांतर्गत नांदेडसह पुसद, किनवट व उमरखेड आणि अकोला अनुरक्षण केंद्रांतर्गत येणाºया अकोला, वाशिम, खामगाव, अचलपूर आदी केंद्रांवरून सध्या हिंदी व मराठी या दोन्ही वाहिन्यांचे प्रसारण केले जाते. मात्र प्रसार भारती महानिदेशालयाने १५ जुलैपासून केवळ मराठी वाहिनीचेच प्रक्षेपण करण्याच्या सूचना दिल्या आहे. त्यामुळे आता १५ जुलैपासून हिंदी वाहिनीचे प्रक्षेपण बंद केले जाणार आहे. या निर्णयामुळे हिंदी वाहिनीच्या प्रेक्षकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.लॉकडाऊनचा असाही लाभप्रसार भारतीने राज्यातील दूरदर्शनची २१ लघु प्रक्षेपण केंद्रे ३१ मार्चला बंद करण्याचा आदेश काढला होता. मात्र लॉकडाऊनमुळे त्या आदेशाची अंमलबजावणी झाली नाही. परिणामी राज्यातील ही सर्व केंद्रे पूर्ववत सुरू राहिली.

टॅग्स :Governmentसरकार