शहरं
Join us  
Trending Stories
1
थलपती विजयच्या ड्रायव्हरचा मुलगा झाला आमदार! तिकीट मिळालं तेव्हा स्टेजवर ढसढसा रडला होता...
2
Election Results 2026 LIVE: मुंबईत भाजपाचा 'झालमुरी स्टॉल', पश्चिम बंगाल विजयाचं हटके सेलिब्रेशन
3
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
4
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
5
जागतिक खळबळ: अमेरिकन युद्धनौकेवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; दोन मिसाईल डागली, शस्त्रसंधी तुटली, युद्धाला पुन्हा तोंड फुटणार
6
दोन वर्षातच पश्चिम बंगालमध्ये असं काय बदललं की ममता बॅनर्जींना सत्तेवरून जावं लागलं?
7
भवानीपूर: ममता बॅनर्जी अन् सुवेंदू अधिकारी एकाचवेळी मतमोजणी केंद्रावर; मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात
8
विजयचा झंझावात एवढा की...! मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन देखील आपली सीट वाचवू शकले नाहीत; TVK चे व्ही. एस. बाबू 'जायंट किलर'
9
IAS Aastha Singh : प्रेरणादायी यशोगाथा! आजोबांनी दाखवलं स्वप्न; अवघ्या २१ व्या वर्षी कोचिंगशिवाय आस्था बनली IAS
10
दिवसाला ८ तास कुलर चालवताय? मग महिन्याला किती वीज बिल येईल? वॉटनुसार जाणून घ्या खर्च!
11
IPL 2026 Points Table : प्लेऑफ्सच्या शर्यतीत कमालीचे ट्विस्ट! कोण टिकणार? कोणाचा प्रवास संपणार?
12
पश्चिम बंगाल, तामिळनाडूने बदललं देशाचे राजकारण; इंडिया आघाडीच्या भवितव्यावरही प्रश्न
13
NTR, MGR ते जयललिता..; 'या' सुपरस्टार्सनी मुख्यमंत्रिपदापर्यंत मारलेली मजल, पाहा यादी...
14
जबलपूर क्रूझ दुर्घटनेत ५ वर्षांच्या विराजचा मृत्यू; पित्याचा आक्रोश पाहून उपस्थितांच्या काळजाचंही झालं पाणी!
15
“पश्चिम बंगालमध्ये विकासाची बुलेट ट्रेन वेगाने धावेल”; DCM शिंदेंकडून मोदी-शाह यांचे अभिनंदन
16
भीषण अपघात: सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर एसटी बस आणि डंपरची जोरदार धडक; दोन प्रवाशांचा मृत्यू, डंपरने घेतला पेट
17
हिमंता बिस्वांना आव्हान दिले, पण होमग्राऊंडवरच हरले, राहुल गांधींचे सहकारी गौरव गोगोईंचा दारुण पराभव
18
भारताच्या माजी क्रिकेटपटूची राजकीय मैदानात दमदार एंट्री, बड्या नेत्याविरोधात घेतली मोठी आघाडी
19
'या' स्टॉकनं केलं मालामाल! ५ वर्षांत १४००% चं छप्परफाड रिटर्न, आज पुन्हा अपर सर्किट
20
मोठी घडामोड! काँग्रेस केरळनंतर दुसऱ्या राज्यातही सत्तास्थापन करणार? थलापती विजयच्या वडिलांचे निमंत्रण
Daily Top 2Weekly Top 5

दहेगाव आरोग्य केंद्राची दैना

By admin | Updated: October 5, 2015 02:36 IST

राळेगाव तालुक्याच्या दहेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राची दैना वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी प्रत्यक्ष अनुभवली.

किन्ही(जवादे) : राळेगाव तालुक्याच्या दहेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राची दैना वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी प्रत्यक्ष अनुभवली. शनिवारी त्यांनी या प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन तेथील प्रश्न जाणून घेतले. यावेळी नागरिकांनी सदर आरोग्य केंद्राच्या कारभाराविषयी तक्रारीचा पाढा वाचला.सुरुवातीला किशोर तिवारी यांनी या आरोग्य केंद्रात कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या निवासस्थानांची पाहणी केली. पाहणी सुरू असतानाच गावकरी या ठिकाणी दाखल झाले. त्यांनी सदर आरोग्य केंद्रात अधिकारी आणि कर्मचारी उपलब्ध होत नाही, केवळ तीन ते चार तास अधिकारी सेवा बजावतात, कर्मचाऱ्यांची रुग्णांसोबतची वागणूक अरेरावीची असते आदी प्रकारच्या तक्रारी करण्यात आल्या. सिकलसेलच्या रुग्णांसाठी असलेली फोलिक अ‍ॅसीड ही औषधी या आरोग्य केंद्रामध्ये मागील तीन महिन्यांपासून उपलब्ध नाही. ही गंभीर बाब यावेळी मांडण्यात आली. अधिकारी आणि कर्मचारी मुख्यालयी राहात नसल्याने रुग्णांना अपवादानेच दाखल करून घेतले जाते. ‘रेफर’चा आजारच या आरोग्य केंद्राला झाला आहे. शिवाय कर्मचाऱ्यांचा तुटवडा ही बाबही यावेळी निदर्शनास आणून देण्यात आली. औषधी वितरक नाही त्यामुळे एखाद्या कर्मचाऱ्याकडून ही जबाबदारी पूर्ण करून घेतली जाते. दहेगावचे सरपंच शेषराव ताजने, विनोद मेश्राम, प्रवीण लोडे आदींनी या आरोग्य केंद्राच्या समस्या मांडल्या. (वार्ताहर)