शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
6
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
7
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
8
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
9
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
10
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
11
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
12
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
13
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
14
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
15
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
16
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
17
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
18
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
19
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
20
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

कपाशी, सोयाबिनवर कीड, रोगांचा प्रादुर्भाव

By admin | Updated: September 11, 2014 23:52 IST

सुरूवातीला कमी पावसात शेतकऱ्यांनी कपाशीची पिके जगविली. मात्र त्यानंतर अतिपाऊस आणि फुलकिडे, मर रोगासह आता कपाशीवर लाल्या रोगाने, तर सोयाबिनवर चक्रीभुंग्याने आक्रमण केल्याने हाता-तोंडाशी

वणी : सुरूवातीला कमी पावसात शेतकऱ्यांनी कपाशीची पिके जगविली. मात्र त्यानंतर अतिपाऊस आणि फुलकिडे, मर रोगासह आता कपाशीवर लाल्या रोगाने, तर सोयाबिनवर चक्रीभुंग्याने आक्रमण केल्याने हाता-तोंडाशी आलेले पिकही हातचे जाण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे. परिणामी शेतकरी देधोधडीला लागण्याची शक्यता बळावली आहे.विदर्भातील नगदी पीक म्हणून कापसाला ओळखले जाते़ परंतु गेल्या तीन-चार वर्षांपासून कपाशीवर केलेला खर्चही शेतकऱ्यांना परवडेनासा झाला आहे़ तथापि शेती हाच मुख्य व्यवसाय असल्याने आणि शेतीशिवाय दुसरा पर्यायच नसल्याने नाईलाजाने विदर्भातील शेतकरी जादा प्रमाणात कापूस पिकांची लागवड करीत असतात़ त्यातच कापसाला हमी भाव कमी मिळत असल्याने शेतकरी आत्महत्या करीत आहे़ यवतमाळ जिल्ह्यात सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या झाल्या असून या जिल्ह्याला शेतकरी आत्महत्यांचा जिल्हा म्हणून ओळखले जात आहे़यंदा खरीप हंगामात निसर्गाने शेतकऱ्यांचा अंतच पाहिला़ जून-जुलै महिन्यात झालेल्या अल्पशा पावसावर शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी केली. मात्र पुरेसा पाऊस न झाल्यामुळे पिके उगवलीच नव्हती़ त्यानंतर शेतकऱ्यांनी प्रतिकूल परिस्थितीत दुबार, तिबार पेरणी केली़ परंतु पावसाने १५ ते २० दिवस दडी मारल्याने शेतकरी संकटात सापडले. त्यामुळे त्यांना कर्जही घ्यावे लागले़ तरीही शेतकऱ्यांनी पिके जगवली़ आता कपाशीला फुलेही लागली. तथापि गेल्या सप्ताहात तालुक्यात संततधार पाऊस प्झाला. त्यामुळे जमिनीतील ओलावा हटत नसल्यामुळे कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे़ यामुळे शेतकरी देशोधडीला लागत आहे़यावर्षी तालुक्यातील शेतकऱ्यांना पावसाअभावी तब्बल २८ हजार ९३३ हेक्टवर कपाशीची दुबार-तिबार पेरणी करावी लागली. सोबतच २३५ हेक्टरवर सोयाबीन, दोन हजार २५५ हेक्टरवर तूर, तर ७३ हेक्टरवर ज्वारीची दुबार पेरणी करावी लागली. तालुक्यात ४१ हजार ४९४ हेक्टरवर कपाशी, सात हजार ५९ हेक्टरवर सोयाबीन, पाच हजार ४४६ हेक्टरवर तूर, तर ५७८ हेक्टरवर ज्वारीची पेरणी पूर्ण झाली.आता कपाशीवरील लाल्या रोगाचा प्रतिबंध कसा करावा, या विवंचनेत शेतकरी सापडले आहे़ बँकाही पुन्हा कर्ज देण्यास नकार देत असल्याने महागडी औषधी घेऊन झाडावर फवारणी कशी करावावी, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे़ शासनाकडून मदत मिळावी, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत. (कार्यालय प्रतिनिधी)