शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
6
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
7
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
8
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
9
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
10
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
11
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
12
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
13
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
14
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
15
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
16
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
17
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
18
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
19
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
20
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

पुसदसाठी काँग्रेसच्या मुलाखती

By admin | Updated: September 1, 2014 23:55 IST

राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या विधानसभा मतदारसंघासाठी काँग्रेसने रविवारी मुंबईत मुलाखती घेतल्या. त्यात पुसद मतदारसंघासाठी पाच इच्छुकांनी मुलाखतीला हजेरी लावली.

यवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या विधानसभा मतदारसंघासाठी काँग्रेसने रविवारी मुंबईत मुलाखती घेतल्या. त्यात पुसद मतदारसंघासाठी पाच इच्छुकांनी मुलाखतीला हजेरी लावली. पुसद विधानसभा मतदारसंघ मनोहरराव नाईक यांच्या रुपाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आहेत. आघाडी तुटली आणि स्वबळावर निवडणुका लढविण्याची वेळ आल्यास धावपळ होऊ नये म्हणून काँग्रेसनेही राष्ट्रवादीच्या ताब्यातील ११४ मतदारसंघांसाठी मुलाखती घेतल्या. त्यात पुसद विधानसभेसाठीही मुलाखती पार पडल्या. त्यामध्ये या मतदारसंघातून दोन डॉक्टर, दोन नगरसेवक व एका माजी नगरसेवकांनी सहभाग घेतला. पाच पैकी एक इच्छुक अखिल भारतीय युवक काँग्रेसचे पदाधिकारी आहेत. जिल्ह्यातील सात पैकी सहा मतदारसंघावर काँग्रेसचा दावा आहे. त्यासाठीच्या मुलाखती आधीच पार पडल्या. मात्र राष्ट्रवादीने राज्यातील सर्वच २८८ मतदारसंघासाठी मुलाखती घेतल्याचे वृत्त बाहेर आल्याने काँग्रेसनेही उर्वरित सर्वच मतदारसंघात मुलाखती घेतल्या. जिल्ह्यात यावेळी पहिल्यांदाच राष्ट्रवादीच्या ताब्यातील मतदारसंघांसाठी मुलाखती घेतल्या गेल्या. काँग्रेसच्या ताब्यातील यवतमाळ, उमरखेड व दिग्रसवर राष्ट्रवादीने दावा सांगितला. यवतमाळसाठी राष्ट्रवादीचा सर्वाधिक जोर आहे. (जिल्हा प्रतिनिधी)