शहरं
Join us  
Trending Stories
1
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
2
अजितदादांच्या अपघातादिवशीच विमान कंपनीला ९ कोटींचे बक्षीस; रोहित पवारांचे खळबळजनक आरोप
3
भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र...
4
Top Marathi News LIVE Updates: "दादांच्या अंत्यविधीच्या दिवशी १६ कोटी दिले"; रोहित पवारांचा 'व्हीएसआर' कंपनीवरून सरकारवर हल्ला
5
गोलsss... पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सिक्कीमच्या तरूणांसोबत खेळला फुटबॉल, PHOTOSची रंगली चर्चा
6
वाढदिवसासाठी Reel तयार करण्याच्या नादात युवकाने भलताच उद्योग केला; शेवटी हातात पडल्या बेड्या
7
Adhar Card : मोठा बदल! आता आधार कार्ड तुमचे वय सिद्ध करणार नाही, तुम्हाला जन्मतारखेचा पुरावा म्हणून 'ही' कागदपत्रे दाखवावी लागणार
8
कलमा वाचता येतो का? विचारले अन् सुरक्षा रक्षकांवर चालवला चाकू; मीरा रोडच्या हल्ल्यात 'लोन वुल्फ'चा संशय
9
Robert Kiyosaki Prediction: रॉबर्ट कियोसाकी यांची २०२६-२७ मध्ये मोठ्या आर्थिक संकटाची भविष्यवाणी; भारतीय गुंतवणूकदारांनी काय करावं?
10
तुमच्या छोट्याशा बाल्कनीला, खिडकीला द्या 'ग्रीन टच'; कमी जागेत बाग फुलवण्याच्या 'मास्टर ट्रिक'
11
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
12
हृदयद्रावक! IPL सामना पाहून घरी परतणाऱ्या २ भावांवर काळाचा घाला; 'हिट अँड रन'मध्ये मृत्यू
13
Mutual Fund Redemption Rules: काय आहे FIFO नियम आणि तो कसा वाचवतो तुमचा टॅक्स? जाणून घ्या डिटेल्स
14
बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने झाला 'त्या' चार जणांचा मृत्यू? पोस्टमार्टेम रिपोर्टमधून समोर आलं खरं कारण
15
एका दुखापतीने संपवलं करियर.. अवघ्या ३०व्या वर्षी क्रिकेटपटूला करावी लागली निवृत्तीची घोषणा
16
Chanakya Niti: समाजात राजासारखा मान हवा? चाणक्यनीतीतल्या 'या' ५ सवयी तुमचं आयुष्य बदलतील!
17
भारत-न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक 'मैत्री'! ५००० भारतीयांना थेट नोकरीची संधी, मोठे फायदे कोणते?
18
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
19
Gold-Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात बदल; पटापट चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K आणि १८K Gold चे नवे दर
20
घरात मोबाइल नेटवर्क मिळणे झाले कठीण; इमारतींना ‘डिजिटल रेटिंग’ देण्याचा ‘ट्राय’चा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बँकेला अकोल्याच्या ‘केसीसी’ पॅटर्नची भुरळ

By admin | Updated: November 20, 2014 22:59 IST

पश्चिम विदर्भातील जिल्हा बँकांचा एनपीए २६ ते ३६ टक्क्यापर्यंत वाढलेला असताना अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मात्र ‘केसीसी’च्या (किसान कॅश क्रेडीट) बळावर त्याला अपवाद ठरली आहे.

यवतमाळ : पश्चिम विदर्भातील जिल्हा बँकांचा एनपीए २६ ते ३६ टक्क्यापर्यंत वाढलेला असताना अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मात्र ‘केसीसी’च्या (किसान कॅश क्रेडीट) बळावर त्याला अपवाद ठरली आहे. हाच केसीसी पॅटर्न आता यवतमाळात राबविण्याचा विचार केला जात आहे. यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा एनपीए (संशयित बुडित कर्ज) २६ टक्क्यांवर पोहोचला आहे. त्याच वेळी अकोला जिल्हा बँकेचा एनपीए नियंत्रणात आहे. विभागीय सहनिबंधक कार्यालयाने हा एनपीए आठ टक्के असल्याचे सांगितले. तर अकोला जिल्हा बँकेच्या संचालकांनी आपला एनपीए शून्य टक्के असल्याचा दावा केला आहे. अकोला जिल्हा बँकेचा एनपीए नियंत्रणात राहण्यासाठी केसीसी योजना महत्वाची ठरल्याचे सांगितले जाते. एटीएम असलेल्या शेतकऱ्यांसाठीच ही योजना आहे. या योजनेअंतर्गत दरवर्षी जुन्या पीक कर्जाचे पुनर्गठण केले जाते. त्यामुळे बँकेच्या रेकॉर्डवर थकबाकी दिसतच नाही. पुनर्गठणामुळे शेतकरी थकबाकीदार होत नाही आणि बँकेलाही फारसे प्रयत्न न करता दरवर्षी कर्जाची वसुली मिळते. यवतमाळ जिल्ह्यात मात्र दुष्काळामुळे थकीत पीक कर्जाचे बँकेला रुपांतरण करून द्यावे लागते. म्हणूनच अकोल्याचा हा केसीसी पॅटर्न यवतमाळ जिल्ह्यातही राबविण्याचा विचार बँक व्यवस्थापन करीत आहे. या संबंधीचा प्रस्ताव संचालक मंडळाच्या आगामी बैठकीत ठेवला जाणार आहे. यवतमाळ जिल्हा बँकेचा एनपीए २६ टक्के आहे. विभागीय सहनिबंधकांनी तो ३१ मार्चपर्यंत कमी करण्याचा अल्टीमेटम दिला आहे. तो कमी कसा करणार याचा कार्यक्रम सहनिबंधकांना सादर करताना बँकेने १५ टक्के कमी करण्याची हमी दिली आहे. त्याचाच एक भाग म्हणून केसीसी पॅटर्न जिल्ह्यात राबविण्याची तयारी सुरू आहे. (जिल्हा प्रतिनिधी)