शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयांनंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
2
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
4
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
5
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
6
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
7
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
8
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
9
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
10
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
11
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
12
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
13
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
14
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
15
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
16
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
17
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
18
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
19
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
20
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
Daily Top 2Weekly Top 5

अन् ३९ वर्षांनंतर पुसदमध्ये भरला वर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 06:00 IST

शिक्षण प्रसारक मंडळद्वारा संचालित येथील कोषटवार दौलतखान विद्यालयात १९८० साली दहावीचे पेपर संपले आणि सर्व जण महाविद्यालयाकडे आपले भविष्य घडविण्यासाठी निघाले. ३९ वर्षांनंतर स्वातंत्र्य दिनी सर्व वर्ग मित्रांनी सकाळी ७.३० वाजता को.दौ. शाळेत झेंडा वंदनाला उपस्थिती दर्शविली.

ठळक मुद्देमित्र एकत्र : १९८० मध्ये दहावी उत्तीर्ण होणारे सवंगडी झाले गोळा, शिक्षकांचा केला सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : शाळा सोडून तब्बल ३९ वर्षे झाली. कामानिमित्त कोण कुठे असेल, याची कुणालाही कल्पना नाही. मात्र म्हणतात ना रक्ताच्या नात्यापेक्षा मैत्रीचे नाते महत्वाचे असते. या मित्रत्वाचे नाते जोपासणारे शाळेतील काही मित्र-मैत्रिणी १९८० ला शाळा सोडल्याननतर तब्बल ३९ वर्षानंतर पुन्हा एकत्र आले. अन् तब्बल ३९ वर्षांनंतर त्यांचा पुन्हा वर्ग भरला.शिक्षण प्रसारक मंडळद्वारा संचालित येथील कोषटवार दौलतखान विद्यालयात १९८० साली दहावीचे पेपर संपले आणि सर्व जण महाविद्यालयाकडे आपले भविष्य घडविण्यासाठी निघाले. ३९ वर्षांनंतर स्वातंत्र्य दिनी सर्व वर्ग मित्रांनी सकाळी ७.३० वाजता को.दौ. शाळेत झेंडा वंदनाला उपस्थिती दर्शविली.त्यानंतर विद्यालयाला कायमस्वरुपी २५ हजार रुपयांची मुदती ठेव बहाल केली. त्यातून मिळणाऱ्या व्याजातून दहावीच्या परीक्षेत प्रथम व द्वितीय येणाऱ्या विद्यार्थ्यांना पुरस्कार देण्याचे जाहीर केले. यानंतर सर्व मित्रांनी स्वत:चा परिचय दिला. सायंकाळी सेवानिवृत्त शिक्षक अनंत उपाध्ये, नारायण क्षीरसागर, वसंत ताजनेकर, निलीमा लांबे, रामचंद्र रेवणवार, राजेंद्र आमले या गुरुजनांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन यथोचित सत्कार केला. रात्री काही उत्साही वर्गमित्र-मैत्रिणींनी गायन, नृत्य व मिमिक्री सादर केली.या स्नेहमिलन सोहळ्यात डॉ.उमेश रेवणवार, किशोर जाजू, डॉ.विजय जाजू, अ‍ॅड.उमाकांत पापीनवार, प्रमोद रायपूरकर, अ‍ॅड.सुनील बिडवई, डॉ.सुहास पळसकर, गिरीश देशमुख, संजय एडतकर, अतुल जकाते, डॉ.संजय जोशी, समीर भास्करवार, संतोष देशमुख, धनंजय गायकवाड, शशिकांत जहागिरदार, शैलेश नाईक, संजय बयास, मंजुषा राठोड, मंजुषा देशमुख, संजय तांबेकर, अशरफ अमदनी, उज्वला वाघमारे, विनायक सेवकर, रवी देशपांडे, डॉ.सुप्रिया चिद्दरवार, संजय भंडारी, विलास वायकोस, धनंजय पांडे आदी सहभागी झाले होते.

टॅग्स :Schoolशाळा