शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
4
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
5
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
6
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
7
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
8
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
9
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
10
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
11
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
12
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
13
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
14
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
15
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
16
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
17
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
18
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
19
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
20
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

पैनगंगेच्या काठावरील ५४ गावे तहानलेली

By admin | Updated: May 25, 2014 00:00 IST

तालुक्यातील पैनगंगा नदीकाठीच्या ५४ गावांत निर्माण झालेल्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी इसापूर धरणातून पाणी सोडण्यात आले. मात्र अधिकार्‍यांच्या नियोजनशून्यतेमुळे टंचाईग्रस्त

उमरखेड (कुपटी) : तालुक्यातील पैनगंगा नदीकाठीच्या ५४ गावांत निर्माण झालेल्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी इसापूर धरणातून पाणी सोडण्यात आले. मात्र अधिकार्‍यांच्या नियोजनशून्यतेमुळे टंचाईग्रस्त गावापर्यंत पाणी पोहोचलेच नाही. त्यामुळे पाणीटंचाई कायम असून माजी आमदारासह गावकर्‍यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. तर उमरखेडच्या तहसीलदारांनी संबंधित उपअभियंत्याच्या विरोधात अहवाल जिल्हाधिकार्‍यांकडे पाठविला आहे.

उमरखेड तालुक्यातील पैनगंगा नदीतीरावरील ५४ गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. इसापूर धरणाचे पाणी पैनगंगेच्या पात्रात सोडवावे या मागणीसाठी नागरिकांनी आंदोलनात्मक पवित्रा घेतला होता. शेवटी इसापूर धरणातून पाच दशलक्ष पाणी सोडण्याचा निर्णय झाला. पाणी सोडण्यात आले. मात्र प्रत्यक्षात टंचाईग्रस्त गावापर्यंंत पाणी पोहोचलेच नाही. पाणीटंचाईसंदर्भात परिस्थिती पाहून आमदार विजय खडसे व तहसीलदार सचिन शेजाळ यांच्या प्रयत्नाला खो देत प्रकल्पाच्या उपविभाग क्र. १ चे उपअभियंत्याच्या चुकीच्या नियोजनाने ३.१५ टीसीएम पाणी टंचाईग्रस्तांना मिळाले नाही. याबाबत आमदार खडसे यांनी चांगलीच कान उघाडणी केली. तर तहसीलदार सचिन शेजाळ यांनी अभियंत्याच्या विरोधात अहवाल जिल्हाधिकार्‍यांकडे पाठविला आहे. पाच दशलक्ष घनमीटर पाणी पात्रात सोडण्यासंबंधी जिल्हाधिकार्‍यांकडून आदेश आला होता. त्यानुसार भीषण पाणीटंचाई असणार्‍या लिंगी, मुरली, सहस्त्रकुंड, पेंदा, बिटरगाव, सावळेश्‍वर, पिंपळगाव, लोहरा, देवसरी, चातारी, संगम चिंचोलीसह अनेक गावांना पाणी कसे द्यायचे याचा आराखडा तहसीलदार शेजाळ यांनी उध्र्व पैनगंगा प्रकल्पाच्या अभियंत्याला दिला. परंतु त्यांनी ३.१५ टीसीएम पाण्याचा अपव्यय केला. यासंदर्भात दत्तराव शिंदे, भीकू जाधव, डॉ. भगवान देवसरकर, प्रेमराव वानखडे, चक्रधर देवसरकर, शिवाजी वानखडे यांच्यासह अनेकांनी संबंधित अधिकार्‍याच्या विरोधात तहसीलदारांना निवेदन दिले. तर उमरखेडचे माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर यांनी चुकीचे काम करणार्‍या उपअभियंत्यावर कठोर कारवाईची मागणी केली. तसेच या विरोधात आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला. नियोजनशून्यतेमुळे पैनगंगा तीरावरील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याने नागरिकात तीव्र असंतोष पसरला आहे. (वार्ताहर)