Next

कराडमध्येच सोमय्या यांना ताब्यात घेतलं.. अशी केली कारवाई | Kirit Somaiya Detained At Karad

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2021 10:44 AM2021-09-20T10:44:14+5:302021-09-20T10:44:34+5:30

सातारा : भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांना कराड पोलिसांनी ओगलेवाडी येथील रेल्वे स्टेशनवर ताब्यात घेतले आहे. आज मंगळवार रोजी पहाटे साडेचारच्या सुमारास ते कोल्हापूरकडे जात असताना त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर, त्यांना शासकीय विश्रामगृहाकडे नेण्यात आले आहे. किरीट सोमैय्यांनी पत्रकार परिषद घेणार असल्याचं जाहीर केलंय. त्यामुळे, आता नियोजित वेळेनुसार सोमैय्यांची पत्रकार परिषद होणार की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.