Next

Sameer Wankhede active again...धडक कारवाई अन् ११२७ किलो गांजा जप्त | NCB Wankhede again in action

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2021 02:19 PM2021-11-16T14:19:58+5:302021-11-16T14:20:17+5:30

'Aryan Khan' अटकेनंतर NCB मुंबईचे झोनल डायरेक्टर SAMEER WANKHEDE चांगलेच चर्चेत आले. आधी आर्यन प्रकरणात धडक कारवाई केली म्हणून आणि नंतर Nawab Malikच्या आरोपांनी. मलिकांच्या गौप्यस्फोटांनंतर वानखेडे थोडे दिवस शांत झाले होते, पण आता आर्यन प्रकरण थंड होतंय, वानखेडे पुन्हा सक्रिय झालेत. वानखेडेंच्या नेतृत्वात मुंबई एनसीबीनं 1127 किलोचा गांजा पकडला. विशेष म्हणजे मुंबई एनसीबीनं नांदेडमध्ये जाऊन ही कारवाई केली. आंध्रप्रदेशातून हा गांजा महाराष्ट्रात आणला जात होता. समीर वानखेडेंच्या नेतृत्वात झालेल्या या कारवाईत दोन जणांना अटकही करण्यात आलीय, त्यांना कोर्टापुढे हजर करण्यात येणार आहे. कारवाईत एक ट्रकही जप्त करण्यात आलाय. जळगाव जिल्ह्यातील एरंडोल इथं ही कारवाई करण्यात आली.