शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
4
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
5
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
6
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
7
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
8
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
9
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
10
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
11
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
12
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
13
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
14
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
15
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
16
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
17
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
18
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
19
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
20
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

संगणकीय स्वाक्षरीच्या दाखल्यांमध्ये वाशिम तालुका राज्यात अव्वल

By admin | Updated: September 11, 2014 22:37 IST

इ-डिस्ट्रिक्ट प्रोजेक्ट : १0 हजार ८४0 दाखल्यांचे वितरण.

वाशिम : इ-डिस्ट्रिक्ट प्रोजेक्टअंतर्गत संगणकीय स्वाक्षरीद्वारे १0 हजार ८४0 दाखल्यांचे वितरण करून, वाशिम तहसील कार्यालय राज्यात संगणकीय कामकाजात प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले आहे. १0 सप्टेंबर रोजी हा बहुमान वाशिम तालु क्यास घोषित करण्यात आला आहे.संगणकीय प्रणालीचा वापर करून कामकाज ह्यहायटेकह्ण करण्यासाठी राज्यभर इ-डिस्ट्रिक्ट प्रोजेक्ट १ जानेवारी २0१४ पासून राबविण्यात येत आहे. संगणकीय स्वाक्षरीद्वारे विविध प्रकारचे दाखले व प्रमाणपत्र वितरित करण्याचे प्रमाण वाढावे, यासाठी प्रथम, द्वितीय व तृतिय क्रमांकाची पारितोषिक योजनाही सुरू करण्यात आली आहे. त्या योजने अंतर्गत वाशिम तहसील कार्यालय अव्वल ठरले आहे तर धुळे तहसील कार्यालय द्वितीय तर कोल्हापूर तहसील तृतिय क्रमांकावर आहे.वाशिम तहसील कार्यालयाने जिल्हाधिकारी रामचंद्र कुलकर्णी व उपविभागीय अधिकारी अशोक अमनकार यांच्या मार्गदर्शनात १ जानेवारी ते ३१ ऑगस्ट २0१४ या कालावधीत जवळपास १0 हजार ८४0 दाखल्यांचे वितरण केले. यामध्ये इ- महासेवा केंद्र व सेतुमार्फत आलेले नऊ हजार ३0४ उत्पन्नाचे दाखले, एक हजार ४२९ अधिवास प्रमाणपत्र, ११ ज्येष्ठ नागरीक प्रमाणपत्र, १0 जन्म नोंदी आदेश, १0 मृत्यू नोंदी आदेश व ७६ इतर प्रमाणपत्र अशा एकूण १0 हजार ८४0 प्रमाणपत्रांचा समावेश आहे. ऑगस्ट महिन्याच्या अखेरिस राज्यस्तरावर संगणकीय कामकाजाचे मूल्यमापन केले असता, यात वाशिम तहसील कार्यालय अव्वल ठरले.