शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
2
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
4
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
5
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
6
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
7
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
8
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
9
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
10
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
11
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
12
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
13
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
14
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
15
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
16
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
17
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
18
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
19
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
20
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

थांबा... थंड पाणी प्या, मन शांत करा,मगच समोर जा...! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 16:50 IST

येथील वयोवृध्द बंडूजी इंगोले यांच्या मुलांनी कारंजा ते मानोरा रोडवरील कुपटा ते दारव्हा रोड नजीकच्या त्यांच्या स्वत:च्या शेतातील  विहीरीजवळ पाणपोई उभारली.

लोकमत न्यूज नेटवर्ककुपटा:  उन्हाळ्याच्या रखरखत्या उन्हाने सर्व जीवांची लाही लाही झाली असुन त्यातच पिण्याच्या पाण्याची टंचाई लक्षात घेता व्यावसायीकांनी गावे गावी शुध्द व थंडपाण्याचे आर.ओ.प्लँट लावुन पैसा कमावण्याचा घाट घातला  असतानाच येथील वयोवृध्द बंडूजी इंगोले यांच्या मुलांनी कारंजा ते मानोरा रोडवरील कुपटा ते दारव्हा रोड नजीकच्या त्यांच्या स्वत:च्या शेतातील  विहीरीजवळ पाणपोई उभारली. त्यावर थांबा, थंड पाणी प्या, मनशांत करा, मगच समोर जा ’ असे फलक लावल्याने रस्त्यावरुन येºजा करणारे प्रवासी आकर्षित होत आहेत. तसेच त्यांच्या या शुध्द व शितजल वाटपाचे कौतूक करताना दिसून येत आहेत. इंगोले यांचा स्वताचा आर.ओ. प्लँन्ट असून ते गावातील लोकांना पाणी देण्यासोबतच आपणासही समाजाचे काही देणे घेणे लागते हा विचार मनात ठेवत मानोरा कारंजा रोड लगत असलेल्या शेताजवळ पाणपोई  १ जानेवारीपासुन सुरु केली आहे.  येणाºया जाणाºया लोकांना थांबा, थंड पाणी प्या, मन शांत करा, मगच समोर जा अशी पाटी लावुन येणाºया जाणाºया लोकांना पाणी पिण्याची विनंती केली जात आहे. धगधगत्या उन्हात प्रवास करणाºया लोकांचे लक्ष सहजच या पाणपोईकडे जाते. त्यामुळे कुपटाकडून दारव्हाकडे जाणारे कारंजा ते मानोरा ,रोडवर जाणारे येणारे  खाजगी वाहन धारक थांबतात, त्यामुळे त्यातील प्रवाशीही उतरुन थंडपाणी पिवुन शांत होतात, त्याच प्रमाणे दुचाकी स्वारही थांबुन जातात, एवढेच नव्हे तर  एस.टी.बसेस सुध्दा येथे थांबविल्या जाते.त्यातील प्रवाशी सुध्दा येथील थंड पाण्याने आपली तहान भागवितांना दिसून येत आहे. या पानपोईवर सद्यस्थितीत लग्नसराईमुळे दररोज ४० ते ५० कॅन थंड पाणी लागत असल्याची माहिती इंगोले  परिवाराकडून मिळाली. या पाणपोईच्या कल्पनेबाबत विचारणा केली असता  वडील बंडूजी इंगोले यांनी गरीब परिस्थिती असतानाही आम्हाला शिक्षण देवुन मोेठे केले व नोकरीवर लावले. त्यांची ईच्छा आहे की, आपल्याकडूनही जनतेची काही सेवा घडावी, त्यांच्या इच्छेप्रमाणे आम्ही या पानपोईची सुरुवात केली असल्याचे प्रल्हाद इंगोले यांनी सांगितले. या कामी त्यांचे बंधु विठ्ठल इंगोल व वसंता इंगोले यांचे ही  सहकार्य असल्याचे त्यांनी याप्रसंगी कथन केले.

टॅग्स :washimवाशिमWaterपाणीwater scarcityपाणी टंचाई