शहरं
Join us  
Trending Stories
1
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
3
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
4
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
5
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
6
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
7
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
8
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
9
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
11
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
12
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
13
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
14
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
16
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
17
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
18
"छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही...", रितेश देशमुखने धीरेंद्र शास्त्रींना स्पष्ट शब्दांत सुनावलं
19
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
20
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
Daily Top 2Weekly Top 5

११३0 शेतक-यांची वीज जोडणी रखडली

By admin | Updated: May 18, 2015 01:36 IST

रिसोड तालुक्यातील प्रकार ; शेतक-यांच्या हिरव्या स्वप्नाचा भंग.

निनाद देशमुख /रिसोड: शेती सिंचनाखाली आणण्याचा प्रयत्न करणार्‍या शेतकर्‍यांना वीज वितरण कंपनीचा ह्यशॉकह्ण बसत आहे. रिसोड तालुक्यातील एकूण ११३0 शेतकर्‍यांच्या कृषी पंपाची वीज जोडणी रखडली असल्याची माहिती हाती आली आहे. पारंपरिक शेतीला फाटा देऊन अनेक शेतकरी शेतामध्ये नानाविध प्रकारचे प्रयोग करीत आहेत. कृषी विभागाकडून या प्रयोगाला प्रोत्साहन मिळत असले तरी वीज वितरण कंपनीकडून मात्र योग्य सहकार्य मिळत नसल्याचा प्रत्यय शेतकर्‍यांना येत आहे. रिसोड तालुक्यातील ११३0 शेतकर्‍यांनी कृषी पंप वीज जोडणीसाठी वीज वितरण कंपनी शाखा रिसोडकडे २0१२ ते एप्रिल २0१५ या दरम्यान अर्ज सादर केले जात आहे; मात्र या शेतकर्‍यांना अद्यापही वीज जोडणी मिळाली नाही. त्यामुळे शेतकर्‍यांचे हिरवे स्वप्न करपून जात आहे. कृषी पंप वीज जोडणीचे काम औरंगाबादच्या एका खासगी कंपनीला देण्यात आल्याची माहिती रिसोड शाखेचे अभियंता सी.एम. पाठक यांनी दिली आहे.कोरडवाहू शेती परवडत नसल्याची ओरड नेहमीच होत आली आहे. या पृष्ठभूमीवर अनेक शेतकरी सिंचनाची सुविधा उपलब्ध करीत आहेत. रिसोड तालुक्यात विहिरीद्वारे सिंचन करणार्‍या शेतकर्‍यांची संख्या बर्‍यापैकी आहे. विहिरीवर कृषी पंप वीज जोडणी घेऊन शेती फुलविण्याचा प्रयत्न अनेक शेतकरी करीत आहेत. या प्रयत्नातूनच २0१२ नंतर आतापर्यंंत ११३0 अर्ज कृषी पंप वीज जोडणीसाठी वीज वितरण कंपनी शाखा रिसोड या कार्यालयात प्राप्त झाले आहेत; मात्र या अर्जावर कुठलाही विचार नसल्याचे दिसून येत आहे. ३१ डिसेंबर २0१२ पर्यंतची कृषी पंप वीज जोडणीची कामे हाती घेण्यात आली आहे, असे अभियंता सी.एम. पाठक यांचे म्हणणे आहे. कृषी पंप वीज जोडणीच्या कामात एवढा विलंब कशासाठी असा, प्रश्न शेतकरीवर्गातून उपस्थित केला जात आहे.