शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
2
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
3
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
4
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
5
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
6
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
7
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
8
Petrol Diesel Rate: पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? केंद्र सरकारचे मोठे संकेत
9
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
10
WTC 2025-27 Points Table : बांगलादेशचा पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय! टीम इंडिया फायद्यात; ते कसं?
11
सावधान! ९९% लोकांना टरबूज खाण्याची योग्य पद्धतच माहीत नाही; डॉक्टरांनी सांगितलेल्या 'या' ३ चुका पडू शकतात महागात
12
मध्यमवर्ग त्याग करायला तयार आहेच, पण डझनभर गाड्यांचा ताफा...; जयंत पाटील यांची टिप्पणी
13
“२२ लाख विद्यार्थ्यांची स्वप्ने धुळीला मिळाली”; NEET 2026 परीक्षा रद्द, राहुल गांधी संतापले
14
Top Marathi News LIVE Updates: सोलापूर शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं धावपळ
15
“NEET पेपर लीक करणारे मोकाट, सरकारला एक परीक्षाही घेता येत नाही का?”: हर्षवर्धन सपकाळ
16
"सौंदर्यासाठी नाही, तर मी पैशांसाठी तुझ्याशी लग्न केलं"; नवरा झाला हैवान, बायकोचा घेतला जीव
17
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा निर्णय! आपल्या खास ज्योतिष्याला बनवलं थेट 'OSD'
18
मूर्ती लहान, कीर्ती महान! ३ वर्षे ११ महिन्यांच्या जान्हवी सोनीची कमाल; नावावर ३ इंटरनॅशनल रेकॉर्ड
19
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
20
संतापजनक! पिझ्झा तयार करताना थुंकायचा; किळसवाणा Video व्हायरल, लोकांनी बेदम चोपलं
Daily Top 2Weekly Top 5

शेलुनजिक अपघातात एक ठार, एक जखमी

By admin | Updated: December 5, 2014 00:33 IST

चालक फरार : इंडिका व्हिस्टा व दुचाकीचा अपघात.

अनसिंग (वाशिम) : अनसिंग ते पुसद रस्त्यावर शेलू (बु) फाट्यानजिक अनसिंगकडून पुसदकडे जाणार्‍या इंडिका व्हिस्टा या गाडीच्या चालकाने निष्काळजीने भरधाव गाडी चालवून अनसिंगकडे जाणार्‍या दुचाकीस्वारास जबर धडक दिल्याने यामध्ये एक जण जागीच ठार व एक गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी रात्री दरम्यान घडली. इंडिका गाडीचा चालक फरार झाला. अनसिंग पोलीस स्टेशनमध्ये फिर्यादी विनोद दगडूजी शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार फिर्यादीचा भाऊ विजय दगडुजी शिंदे रा. अनसिंग (मारवाडी) व शे. नियमित शे. गफुर हे पुसद रोडने आपल्या मारवाडी (खुर्द) गावावरुन अनसिंगकडे टी.व्ही.एस. कंपनीच्या दुचाकीने येत असताना पुसदकडे जाणारी इंडिका व्हिस्टा पांढरा रंग गाडी क्रमांक एम.एच. २९ एडी 0९८६ ने मोटारसायकलला समोरुन जोरदार धडक दिली. या धडकेत विजय दगडूजी शिंदे वय ४0 वर्षे हा जागीच ठार झाला व सोबत असलेला शे. नियामत शे. गफूर याला गंभीर दुखापत झाली असून, त्याला अकोला येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ पाठविण्यात आले आहे. ही घटना घडताच इंडिकाचा चालक व त्यातील प्रवास करणार्‍यांनी अपघातग्रस्त मोटारसायकलस्वारांना सोडून त्याची कुठलीही मदत न करता फरार झाले आहे. यावरुन अनसिंग ठाणेदार यांनी आरोपीवर ३0४ अ, २७९, ३३८ भादंवि १८४ मोटार अँक्ट नुसार गुन्हा नोंदविला आहे व सदर आरोपीचा शोध घेत आहेत. या अपघातात ठार झालेले विजय दगडुजी शिंदे अनसिंग व परिसरातील लोकांच्या सुखा-दु:खात नेहमी उपयोगी पडत असल्यामुळे अनसिंग व मारवाडी परिसरात हळहळ होत आहे.