शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

पोषण आहारातील ज्वारी, नाचणीचे पदार्थ कागदावरच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2019 13:38 IST

योग्य नियोजनाअभावी ही योजना राबविण्यासाठी २५ टक्के तांदळाची कपात करून बाजरी, ज्वारी आणि नाचणीची मागणीच नोंदविता आली नाही.

वाशिम: राज्य शासनाने गत चार महिन्यांपूर्वी शालेय पोषण आहारात बदल करून ज्वारी, बाजरी, नाचणीचे पदार्थ देण्याची योजना आखली होती. या योजनेची अंमलबजावणी आॅक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासून केली जाणार होती; परंतु योग्य नियोजनाअभावी ही योजना राबविण्यासाठी २५ टक्के तांदळाची कपात करून बाजरी, ज्वारी आणि नाचणीची मागणीच नोंदविता आली नाही. त्यामुळे ही योजना कागदावरच राहिली आहे.शालेय पोषण आहार ही केंद्र पुरस्कृत योजना आहे. पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवीकरिता विद्यार्थी संख्या मंजूर केली जाते. मंजूर विद्यार्थी संख्येनुसार प्रतिविद्यार्थी प्रतिदिन १०० ग्रॅम व १५० ग्रॅमप्रमाणे तांदूळ अथवा इतर धान्य मंजूर केले जाते. जिल्ह्यात सुमारे ३,०५८ शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पोषण आहार दिला जातो. शालेय पोषण आहार योजनेंतर्गत विद्यार्थ्यांच्या आहारात विविधता आणण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारासाठी देण्यात येणाऱ्या पोषण आहारात ज्वारी, बाजरी आणि नाचणीच्या पदार्थांचा समावेश करण्याचा राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने यंदाच्या शैक्षणिक सत्राच्या सुरुवातीलाच घेतला होता. या निर्णयानुसार पोषण आहारासाठी तांदळाच्या मागणीत २५ टक्क्यांची कपात करून त्याऐवजी ज्वारी, नाचणी, बाजरी या धान्याचा वापर करून विविध पदार्थ, पाककृती निश्चित करण्याच्या सूचनाही सर्वच जिल्हास्तरावर देण्यात आल्या होत्या. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी आॅक्टोबर २०१९ ते मार्च २०२० या वर्षाकरिता ज्वारी, नाचणी व बाजरीची मागणी संचालनालयास विहित नमुन्यात सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले होते. तथापि, आॅक्टोबर महिना अर्धा उलटला तरी, या योजनेच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक धान्याची मागणीच नोंदविण्यात आली नाही. योग्य नियोजनाचा अभाव आणि प्रशासनाचा ढिसाळ कारभार, या कारणांमुळे ही योजना कागदावरच राहिल्याची चर्चा आता पालक वर्गात सुरू आहे. 

शालेय पोषण आहारातील बदलानुसार ज्वारी, बाजरी आणि नाचणीची मागणी नोंदविण्याच्या सूचना शासनस्तरावरून देण्यात आल्या होत्या. त्याच वेळी या संदर्भात स्वतंत्र सूचनाही निर्गमित होणार असल्याचे सांगण्यात आले होते; परंतु अद्याप अशा कोणत्याच सूचना प्राप्त झालेल्या नाहीत. त्यामुळे ज्वारी, बाजरी, नाचणीचे पदार्थ वितरित होत नसून, पूर्वीच्या पुरवठ्यातून शालेय पोषण आहार देण्यात येत आहे.- गजाननराव डाबेरावप्र. उपशिक्षणाधिकारी, जि. प. वाशिम

 

टॅग्स :washimवाशिमSchoolशाळा