शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
6
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
7
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
8
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
9
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
10
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
11
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
12
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
13
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
14
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
15
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
16
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
17
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
18
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
19
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
20
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

वाशिममध्ये आज आरोग्य तपासणी शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:50 IST

.............. पिण्याचे शुद्ध पाणी पुरविण्याची मागणी वाशिम : मालेगाव तालुक्यातील जऊळका रेल्वे येथे सार्वजनिक पाणीपुरवठ्याची प्रबळ व्यवस्था अद्यापपर्यंत उभारण्यात ...

..............

पिण्याचे शुद्ध पाणी पुरविण्याची मागणी

वाशिम : मालेगाव तालुक्यातील जऊळका रेल्वे येथे सार्वजनिक पाणीपुरवठ्याची प्रबळ व्यवस्था अद्यापपर्यंत उभारण्यात आलेली नाही. यामुळे पाणीपुरवठा विस्कळीत होऊन त्रास सहन करावा लागत आहे. पिण्याचे मुबलक तथा शुद्ध पाणी पुरविण्यात यावे, अशी मागणी अतुल कुटे यांनी सोमवारी केली.

................

विद्युत पुरवठ्यात वारंवार व्यत्यय

वाशिम : तालुक्यातील काही गावांमध्ये विद्युत पुरवठ्यात वारंवार व्यत्यय निर्माण होत आहे. जोराची हवा सुटल्यास अथवा धुवाधार पाऊस सुरू असल्यास महावितरणकडून कुठलीही पूर्वसूचना न देताना वीजपुरवठा खंडित केला जातो. यामुळे नागरिकांची गैरसोय होत असून, विशेषत: रात्रीच्यास सुमारास या समस्येमुळे डासांचा त्रास बळावला आहे.

.................

कर्ज तत्काळ मंजूर करण्याचे आवाहन

वाशिम : मुख्यमंत्री रोजगार योजनेतून निर्धारित निकषांप्रमाणे पात्र लाभार्थींना विनाविलंब कर्ज मंजूर करण्याच्या शासनाच्या सूचना आहेत. त्याचे पालन करून लाभार्थींना कर्ज मंजूर करावे, असे आवाहन जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक दत्तात्रय निनावकर यांनी केले आहे.

...........

पिण्याचे शुद्ध पाणी पुरविण्याची मागणी

वाशिम : स्थानिक जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल रुग्णांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळणे गरजेचे आहे. मात्र, ही व्यवस्था उपलब्ध नसल्याने रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. याकडे लक्ष पुरवून शुद्ध पाणी पुरविण्याकरिता जिल्हा शल्यचिकित्सकांनी लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.

.................

शौचालय वापराची जनजागृती थंडावली

वाशिम : मध्यंतरी जिल्ह्यात स्वच्छता रथाच्या माध्यमातून शौचालयांचा वापर करण्यासंबंधी प्रभावी जनजागृती करण्यात आली. मात्र, कोरोना काळात हा उपक्रम थंड बस्त्यात पडला. परिणामी, अनेक गावांमध्ये उघड्यावर शाैचवारी सुरू असून, शाैचालय वापराची जनजागृती करावी, अशी मागणी होत आहे.