शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
2
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
3
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
4
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
5
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
6
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
7
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
8
Petrol Diesel Rate: पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? केंद्र सरकारचे मोठे संकेत
9
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
10
WTC 2025-27 Points Table : बांगलादेशचा पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय! टीम इंडिया फायद्यात; ते कसं?
11
सावधान! ९९% लोकांना टरबूज खाण्याची योग्य पद्धतच माहीत नाही; डॉक्टरांनी सांगितलेल्या 'या' ३ चुका पडू शकतात महागात
12
मध्यमवर्ग त्याग करायला तयार आहेच, पण डझनभर गाड्यांचा ताफा...; जयंत पाटील यांची टिप्पणी
13
“२२ लाख विद्यार्थ्यांची स्वप्ने धुळीला मिळाली”; NEET 2026 परीक्षा रद्द, राहुल गांधी संतापले
14
Top Marathi News LIVE Updates: सोलापूर शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं धावपळ
15
“NEET पेपर लीक करणारे मोकाट, सरकारला एक परीक्षाही घेता येत नाही का?”: हर्षवर्धन सपकाळ
16
"सौंदर्यासाठी नाही, तर मी पैशांसाठी तुझ्याशी लग्न केलं"; नवरा झाला हैवान, बायकोचा घेतला जीव
17
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा निर्णय! आपल्या खास ज्योतिष्याला बनवलं थेट 'OSD'
18
मूर्ती लहान, कीर्ती महान! ३ वर्षे ११ महिन्यांच्या जान्हवी सोनीची कमाल; नावावर ३ इंटरनॅशनल रेकॉर्ड
19
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
20
संतापजनक! पिझ्झा तयार करताना थुंकायचा; किळसवाणा Video व्हायरल, लोकांनी बेदम चोपलं
Daily Top 2Weekly Top 5

जलसाठा असतानाही शेती कोरडीच!

By admin | Updated: March 15, 2016 02:19 IST

मुख्यमंत्री, ऊर्जामंत्र्यांच्या आदेशाची अवहेलना.

देपूळ (जि. वाशिम): चार हजार एकर सिंचन क्षमता असणार्‍या वारा जहाँगीर सिंचन प्रकल्पात पुरेसा जलसाठा असतानाही केवळ वीज वितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे शेतजमीन कोरडीच राहत आहे.
दुष्काळाचा सामना करणार्‍या वाशिम जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांसंबंधी विशेष लक्ष पुरवून १0 बॅरेजेससह वारा जहाँगीर सिंचन प्रकल्पाला विद्युत पुरवठा त्वरित करा, असे आदेश विद्युत वि तरण कंपनीला १५ डिसेंबर २0१५ च्या नागपूर येथील आढावा बैठकीमध्ये ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. असे असताना विद्युत वितरण कं पनीने या प्रकल्पावर विद्युत जोडणी देण्यास सुरुवात केलेली नाही. यामध्ये बहुतांश शेतकरी आ त्महत्याग्रस्त कुटुंबातील व्यक्तीही वीज जोडणीच्या प्रतीक्षेत आहेत. जलसाठा असताना वीज पुरवठा नसल्याने यावर्षीचा हंगाम कोरडाच गेला. परंतु एप्रिल, मे महिन्यात वीज जोडणी न मिळाल्यास पुढील वर्षीचा खरीप व रब्बी हंगाम कोरडाच जाणार आहे. जर जलसाठा असताना जमीन कोरडीच राहून, या भागात शेतकरी आत्महत्या झाल्यास शासनाने १00 कोटी खर्च करुन तयार केलेल्या सिंचन प्रकल्पाचा काय उपयोग, असा सवाल शेतकरी उपस्थित करीत आहेत. आमदार राजेंद्र पाटणी यांनी सिंचन प्रकल्पाला त्वरित विद्युत पुरवठा मिळावा म्हणून वीज वितरण कंपनीच्या अधिकार्‍यांकडून आढावा घेतला. सदर व्यथा ऊर्जामंत्री तथा मुख्यमंत्र्याच्या कानावर टाकली. यावरुन ऊर्जामंत्र्यांनी वाशिमला येऊन या कामाचा आढावा घेतला व वीज जोडणीचे काम त्वरित करण्याचे आदेश ऊर्जामंत्री व मुख्यमंत्र्यांनी दिले. परंतु वीज जोडणीच्या कामाला चक्क वीज वितरण कंपनीने केराची टोपली दाखविल्याचे निर्दशनास येत आहे.
वीज जोडणीच्या कामावर प्रत्यक्ष आमदार पाटणी, ऊर्जामंत्री, मुख्यमंत्री लक्ष देऊन असताना मंगरुळपीर वीज उपविभागांतर्गत येणार्‍या ३३ केव्ही विद्युत उपकेंद्राचे प्रभारी कनिष्ठ अभियंता खंडारे यांच्याकडे सिंचन प्रकल्पावर वीज जोडणी संदर्भातील १00 च्यावर अर्ज धूळ खात पडले आहेत. याउलट वाशिम उपविभागामार्फत याच प्रकल्पावरील वीज जोडणी अर्जाला मंजुरी देऊन नवीन ८ वीज रोहित्र मंजूर केले आहेत. परंतु मंगरुळपीर उपविभागामार्फत एकही नवीन रोहित्र मागणी असून, मंजूर झाले नाही, हे विशेष.