शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मंगल कार्यालयांतील उपस्थितीवर प्रशासनाचा वॉच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 16:38 IST

Washim News नियमांचा भंग झाल्यास दंडात्मक कारवाई आणि वेळप्रसंगी गुन्हाही दाखल होणार असल्याने मंगल कार्यालय, लॉन संचालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लग्न समारंभामध्ये केवळ ५० व्यक्तींनाच उपस्थित राहता येणार असून, या उपस्थितीची माहिती संबंधित पोलीस स्टेशनला देणे बंधनकारक करण्यात आले. कोरोनाविषयक नियमांचा भंग झाल्यास दंडात्मक कारवाई आणि वेळप्रसंगी गुन्हाही दाखल होणार असल्याने मंगल कार्यालय, लॉन संचालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने प्रतिबंधात्मक नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. लग्न समारंभ किंवा इतर छोट्या समारंभ, कार्यक्रमात ५० व्यक्तींनाच परवानगी देण्यात आली आहे. ५० पेक्षा जास्त व्यक्ती आढळून आल्यास संबंधित मंगल कार्यालय, सभागृह, लॉनचे चालक अथवा मालक, व्यवस्थापक यांना १० हजार किंवा प्रति व्यक्ती २०० रुपये यापैकी जी जास्त असेल त्या रक्कमेचा दंड आकारला जाईल. दुसºयांदा अशी बाब आढळून आल्यास मंगल कार्यालय, सभागृह, लॉन १५ दिवसांसाठी सील केले जाणार आहे. लग्न समारंभ अथवा कोणत्याही कार्यक्रमाप्रसंगी गर्दी होणारी मिरवणूक काढता येणार नाही. तसे आढळल्यास नियमानुसार गुन्हाही दाखल करण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला. आयोजकांनी लग्नस्थळी किती लोक उपस्थित राहणार आहेत, याची माहिती संबंधित पोलीस स्टेशनला कळविणे बंधनकारक करण्यात आले आहे. नगर परिषद, पोलीस प्रशासनानेदेखील मंगल कार्यालय, लॉन, सभागृहांना भेटी देण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.

टॅग्स :washimवाशिमCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉक