शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचा पहिला बळी, ६२ वर्षीय महिलेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 15:51 IST

Washim News : वाशिम जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचा पहिला बळी, ६२ वर्षीय महिलेचा मृत्यू

वाशिम : जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचे संकट अधिक गंभीर झाले असतानाच ‘म्युकरमायकोसिस’ हा संसर्गजन्य आजारही येऊन ठेपला आहे. सीटीचा स्कोअर २२ आणि आरटीपीसीआरचा अहवाल पाॅझिटिव्ह असलेल्या ६२ वर्षीय महिलेचा ११ मे रोजी रात्री दोन वाजता ‘म्युकरमायकोसिस’ या आजाराने स्थानिक जिल्हा सामान्य रुग्णालयात मृत्यू झाला. या घटनेने जिल्हाभरात खळबळ माजली असून दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

रिसोड तालुक्यातील मोप येथील महिलेचा  कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आल्याने ती २९ एप्रिल रोजी वाशिम येथील जिल्हा कोविड हेल्थ केअर सेंटरमध्ये उपचारार्थ दाखल झाली होती. सीटी स्कॅन चाचणीचा स्कोअर २२ होता. त्यामुळे परिस्थिती गंभीर होती. अशात ११ मे रोजी सदर महिलेच्या डोळ्याला अचानक सूज आली. संबंधित डाॅक्टरांनी तपासणी करून ‘म्युकरमायकोसिस’ असल्याचे निदान केले आणि तीला अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला; मात्र यावेळी संबंधित महिलेसोबत कोणीही पुरूष नातेवाईक उपस्थित नव्हता. त्यामुळे तातडीने अकोला हलविणे शक्य झाले नाही. अशात रात्री दोन वाजताच्या सुमारास तीचा मृत्यू झाला. दरम्यान, कोरोनापाठोपाठ जिल्ह्यात ‘म्युकरमायकोसिस’ हा आजारही दाखल झाल्याने दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी सर्वतोपरी खबरदारी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

मोप येथील ६२ वर्षीय कोरोना बाधित महिलेस ‘म्युकरमायकोसिस’ जडल्याचे निदान ११ मे रोजी झाले. तीची प्रकृती गंभीर असल्याने तीला तातडीने अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्याचा निर्णय घेतला; मात्र सोबत कोणीही पुरूष नातेवाईक नसल्याने त्यास थोडा विलंब झाला. अशात रात्री दोन वाजताच्या सुमारास तीचा मृत्यू झाला. तथापि, या आजाराने ग्रस्त असलेला इतर कोणी रुग्ण खासगी दवाखान्यांमध्ये भरती आहे का, याची माहिती घेतली जात आहे. नागरिकांनीही खबरदारी घेणे आवश्यक आहे.- डाॅ. मधुकर राठोडजिल्हा शल्य चिकित्सक, वाशिम

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या