सोयाबीन काढणीसाठी गेलेल्या युवकाचा अंगावर वीज पडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2019 16:49 IST2019-10-05T16:49:21+5:302019-10-05T16:49:44+5:30

अंकुश बहिरे हा बळीराम जाधव यांच्या शेतात सोयाबीन सोयाबीन काढणीच्या कामासाठी गेला होता.

18-year-old boy dies after lightning struck him | सोयाबीन काढणीसाठी गेलेल्या युवकाचा अंगावर वीज पडून मृत्यू

सोयाबीन काढणीसाठी गेलेल्या युवकाचा अंगावर वीज पडून मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर जैन (वाशिम) : येथून जवळच असलेल्या वाघी बु. गावातील शेतशिवारात सोयाबीन काढणीच्या कामासाठी गेलेल्या १८ वर्षीय अंकुश शंकर बहिरे या युवकाचा अंगावर विज पडून मृत्यू झाला. ही घटना शनिवार, ५ आॅक्टोबर रोजी दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली.
शिरपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाºया वाघी येथील युवक अंकुश बहिरे हा बळीराम जाधव यांच्या शेतात सोयाबीन सोयाबीन काढणीच्या कामासाठी गेला होता. दुपारी १ वाजताच्या सुमारास अचानक आकाशात ढग दाटून आले आणि विजांच्या कडकडाटात जोरदार पावसाला सुरूवात झाली. यामुळे अंकुश हा शेतातून बाजूला निघून धुºयावर आला असता आकाशातून कडाडत आलेली वीज त्याच्या अंगावर कोसळली. या घटनेत अंकुश होरपळून गंभीररित्या जखमी झाला. त्याला उपचारासाठी वाशिम येथे हलविण्यात आले असता, तेथील डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले.

Web Title: 18-year-old boy dies after lightning struck him