शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
3
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
4
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
5
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
6
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
7
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
8
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
9
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
10
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
11
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
12
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
13
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
14
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
15
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
16
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
17
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
18
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
19
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
20
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्हा कारागृहातील १५० कैद्यांची दहा महिन्यांपासून नातेवाईकांशी भेटगाठ नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 12:31 IST

Washim Central Jail कारागृहात बंदिस्त असलेले १५० कैदी गेल्या १० महिन्यांपासून नातेवाईकांच्या भेटीला आसूसले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमिवर जिल्हा कारागृहातील कैद्यांना त्यांच्या नातेवाईकांची भेट नाकारण्यात आलेली आहे. दरम्यान, वाशिम येथील कारागृहात बंदिस्त असलेले १५० कैदी गेल्या १० महिन्यांपासून नातेवाईकांच्या भेटीला आसूसले आहेत. कारागृह प्रशासनाने त्यांना मोबाईल व व्हिडीओ कॉलची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.कोरोना विषाणू संसर्गाने विविध घटकांवर परिणाम केला आहे. मार्च २०२०पासून कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वत्र वाढायला लागला. यावेळी खबरदारी म्हणून शासनाने सक्तीचे लॉकडाऊन लागू करण्यासोबतच जिल्हा कारागृहातील कैद्यांना संसर्गाची बाधा होऊ नये, यासाठी नातेवाईकांची भेट घेण्यावर निर्बंध आणले.  

कधी मोबाईल फोन; तर कधी व्हिडीओ कॉल!जिल्हा कारागृह प्रशासनाने नातेवाईकांसोबत बोलण्याकरिता कैद्यांना मोबाईल फोन किंवा व्हिडीओ कॉल करण्यास परवानगी दिलेली आहे. येत्या २८ फेब्रुवारीपर्यंत लॉकडाऊनच्या मार्गदर्शक सूचना लागू असल्याने किमान तोपर्यंत तरी कैद्यांना नातेवाईकांची प्रत्यक्ष भेट घेता येणार नाही, अशी स्थिती आहे.

जैन संस्थानतर्फे उबदार कपड्यांचे वाटपजैनांची काशी म्हणून सर्वदूर प्रसिद्ध असलेल्या शिरपूर येथील पार्श्वनाथ दिगंबर जैन संस्थानकडून जिल्हा कारागृहात बंदिस्त असलेल्या कैद्यांना २०० ब्लँकेट देण्यात आली आहेत. याशिवाय जुने ब्लँकेटही उपलब्ध असल्याने थंडीच्या दिवसात कैद्यांची सोय झाली आहे.

कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मार्च २०२०पासून शासनाने जिल्हा कारागृहात बंदिस्त असलेल्या कैद्यांना नातेवाईकांची भेट घेण्यावर निर्बंध घातले आहेत. २८ फेब्रुवारीपर्यंत लॉकडाऊनच्या मार्गदर्शक सूचना लागू असल्याने किमान तोपर्यंत तरी कैद्यांना नातेवाईकांची प्रत्यक्ष भेट घेता येणार नाही; मात्र त्यांना मोबाईल फोन व व्हिडीओ कॉलची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.- सोमनाथ पाडूळेजिल्हा कारागृह अधीक्षक, वाशिम

टॅग्स :washimवाशिमjailतुरुंग