शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
6
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
7
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
8
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
9
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
10
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
11
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
12
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
13
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
14
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
15
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
16
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
17
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
18
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
19
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
20
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

घरात घुसलेला बिबट्या जेरबंद

By admin | Updated: October 9, 2016 02:52 IST

गेल्या महिन्यात पूर्ण वाढ झालेला बिबट्या वन विभागाने पकडला असताना शनिवारी सकाळी आच्छाड खंडिपाडा येथे एका आदिवासी शेतकऱ्याच्या घरात बिबट्याचा बछडा शिरला

- सुरेश काटे,  तलासरीगेल्या महिन्यात पूर्ण वाढ झालेला बिबट्या वन विभागाने पकडला असताना शनिवारी सकाळी आच्छाड खंडिपाडा येथे एका आदिवासी शेतकऱ्याच्या घरात बिबट्याचा बछडा शिरला आणि एकच थरकाप उडाला. त्याच्या आवाजाने घरातील मंडळी अक्षरश: जीव घेऊन पळाली. अखेर डहाणू येथील वन्य जीव संरक्षण संस्थेच्या कार्यकर्त्यांनी जाळी लाऊन त्यास जेरबंद केले.शनिवारी पहाटे तालुक्यातील आच्छाड खंडिपाडा येथील आदिवासी शेतकरी सोन्या ठाकरे याच्या घरात जवळपास एक ते दीड महिन्याचा बिबट्याचा बछडा शिरला व त्याने कोंबडी फस्त केली. कोंबड्याच्या खुराड्यात झटापटीचा आवाज झाल्याने घरातील महिेलेने पाहिले असता बिबट्या शिरल्याचे तिने पाहिले. त्याही परिस्थितीत ती आतल्या खोलीत जाऊन दरवाजा बंद केला. पहाटेच्या सुमारास आरडाओरड करताच गावकरी जमा झाले त्यामुळे घाबरलेला बिबट्याचा बछडा कुडाच्या घरातच लपुन राहील. एव्हाना बघ्यांची गर्दी झाली असली तरी सर्व गावकरी सुरक्षित अंतारावर होते.बिबट्याची माहिती मिळताच बोर्डी वन विभागाचे कर्मचारी घटना स्थळी दाखल झाले त्याला पकडण्यासाठी डहाणू येथील वन्य जीव संरक्षक संस्थेचे कार्यकर्ते धवल कंसारा, एरिक ताडवाला, पूर्वेस तांडेल, सागर पटेल, रेमंड, प्रतीक, तुषार, राहुल इत्यादी सह वन कर्मचारी मनीष जाधव , सोनवणे यांनी बछड्याला कोणतीही इजा न होता जाळी लाऊन पकडले. - अजून काही बिबट्यांचा वावर या भागात असल्याने जंगलात कोणी जाऊ नये असे वन विभागा तर्फे सांगण्यात आले आहे. वन जमिनीवर होत असलेले मोठ्या प्रमाणावर अतिक्र मण वनांचा ऱ्हास, वन हक्क साठी होत असलेली जंगल तोड या सर्व कारणाने भक्ष मिळविण्या साठी वन्य जीवाचे मानवी वस्तीत वावर वाढत आहे. वन कायदाच वन्य प्राण्याच्या जीवावर उठला असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही, असे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.