शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
2
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
3
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
4
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
5
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
6
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
7
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
8
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
9
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
10
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
11
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
12
काकडी फक्त सॅलड नाही, तर आहे 'सुपरफूड'; पण जास्त खाणं टाळा, अन्यथा होईल नुकसान
13
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
14
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
15
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
16
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
17
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
18
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
19
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
20
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस नगरसेवकांना फोडण्यासाठी आमिष व त्रास देणाराया भाजपा नगरसेवका विरोधात पोलीसात तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2020 07:48 IST

उमा सपार ह्या ज्येष्ठ नगरसेविका असुन त्या आजारी आहेत. त्यांना नुकतेच घरी आणले आहे.

मीरारोड - मीरा भार्इंदर महापालिकेच्या महापौर व उपमहापौर पदासाठी २६ फेब्रुवारीला होणाराया निवडणुकीसाठी भाजपाचे नगरसेवक फुटण्याची धास्ती असल्याने भाजपा नगरसेवकांना गोव्याला हलवले असतानाच काँग्रेस नगरसेवकांना फोडण्याचा प्रयत्न करणाराया भाजपा नगरसेवक ध्रुवकिशोर पाटील विरोधात नया नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.महापालिकेत भाजपाचे ६१, शिवसेना २२ व काँग्रेस आघाडीचे १२ नगरसेवक आहेत. भाजपातील असंतोषा मुळे नगरसेवक फुटण्याच्या धास्तीने भाजपा नगरसेवकांना गोव्याच्या द ललित या पंचतारांकीत हॉटेल मध्ये ठेवण्यात आले आहे. शिवसेना व काँग्रेस महाविकास आघाडीचे ३४ नगरसेवक असुन भाजपा कडे स्पष्ट बहुमत असुनही त्यांना नगरसेवक फुटण्याची धास्ती आहे. त्यातच आमदार गीता जैन व समर्थक नगरसेवकांनी माजी आमदार नरेंद्र मेहतांच्या विरोधात आघाडी उघडल्यास भाजपाला फटका बसण्याची चिन्हे आहेत.धास्तावलेल्या भाजपा नेतृत्वाने आता काँग्रेस आघाडीचे नगरसेवक फोडण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. त्यातुनच काँग्रेसच्या ज्येष्ठ नगरसेविका उमा सपार यांना फोडण्यासाठी भाजपाचे नगरसेवक ध्रुवकिशोर पाटील यांनी सतत फोन करुन आमिष दाखवण्यासह मानसिक त्रास दिल्याची तक्रार काँग्रेसने नया नगर पोलीस ठाण्यात केली आहे. शुक्रवारी रात्री काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अंकुश मालुसरे, कार्याध्यक्ष प्रमोद सामंत, नगरसेवक अनिल सावंत, राजीव मेहरा, माजी नगरसेवक शफिक खान, पदाधिकारी दिप काकडे आदींनी नया नगर पोलीस ठाण्यात ध्रुवकिशोर विरोधात तक्रार देऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.उमा सपार ह्या ज्येष्ठ नगरसेविका असुन त्या आजारी आहेत. त्यांना नुकतेच घरी आणले आहे. तसे असताना ध्रुवकिशोर हे सपार व त्यांच्या मुलास सतत फोन करुन भाजपाला साथ देण्यासाठी आमिष दाखवत आहेत. मानसिक त्रास देत आहेत. त्यामुळे ध्रुवकिशोर विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी काँग्रेसने केली आहे. नया नगर पोलीस ठाण्यातुन ध्रुवकिशोर ना फ ोन करुन पोलीस ठाण्यात हजर राहण्यास सांगीतले असता आपण २६ फेब्रुवारी रोजी शहरात येणार असल्याचे सांगीतल्याचे सुत्रांनी सांगीतले.ध्रुवकिशोर यांना लाज वाटली पाहिजे की आजारी वृध्द नगरसेविका व कुटुंबाचा असा छळ करायला. भाजपा कडे स्पष्ट बहुमत असताना त्यांना त्यांच्याच नगरसेवकांवर विश्वास नसल्याचे स्पष्ट होते. . सत्ता आणि संपत्तीसाठी लाचार असणाराया भाजपाच्या अशा नगरसेवकां बद्दल देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी खुलासा करुन मीरा भार्इंदरच्या जनतेची माफी मागावी असे आवाहन मालुसरे यांनी केले आहे. 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरBJPभाजपा