शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
6
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
7
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
8
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
9
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
10
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
11
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
12
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
13
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
14
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
15
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
16
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
17
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
18
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
19
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
20
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

विक्रमगडमध्ये २ हजार होळ्या

By admin | Updated: March 23, 2016 01:56 IST

बदलत्या काळाच्या ओघात सर्वच सणांचे रुप पालटत असले तरी अजुनही विक्रमगड तालुक्यातील विविध ग्रामीण भागातील आदिवासिंकडुन धुळवडीच्या उत्सवात चालत आलेल्या रुढी

तलवाडा : बदलत्या काळाच्या ओघात सर्वच सणांचे रुप पालटत असले तरी अजुनही विक्रमगड तालुक्यातील विविध ग्रामीण भागातील आदिवासिंकडुन धुळवडीच्या उत्सवात चालत आलेल्या रुढी, पंरपंरा, प्रथा जपण्याचा व पारंपारिक पध्दतीने सण साजरे करण्याचा प्रयत्न केला जात आहे़ यंदा तालुक्यात दोन हजार होळी उभारण्यात येणार असुन प्रत्येक घरातून होळी मातेची विधीविध पुजा केली जाणार आहे़ तर दुसऱ्या दिवशी धुळवडीचे रंग उधळुन हा उत्सव साजरा केला जाणार आहे़ त्याचप्रमाणे शहरीभाग सोडला तर बहुतेक सर्वच गाव, खेडयांमध्ये एक गाव एक होळीची प्रथाही आजही जपण्यात येत आहे़होळीनिमीत्त महिलांनी तांदळाच्या पीठापासून दोन दिवस आगोदरच तयार केलेल्या पापडयांचा होळीला व पूजेचे दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य दाखविला जातो़ होळीसाठी लहानमुले तरुण मंडळी प्रत्येक घराघरातून लाकडे, पेंढा, गवत, बांबु गोळा करुन गावाच्या मध्यभागी माळाच्या ठिकाणी (होळीची जागा) ठेवुन दिले जाते़ ग्रामीण भागातील आदिवासी महिला रात्री चंद्र उगवल्यानंतर नटुनथटुन तर लहान मुले गळयात सारखरगाठया (साखरेची माळ) घालुन ढोल ताशांच्या गजरात आरत्या घेवुन गावाच्या मध्यभागी सगळे जमतात़ नविन लग्न झालेल्या आदिवासी जोडप्याने एकमेकांचे हात पकडुन होळी भोवती मोठ मोठया आरोळया देत गोल होळी भोवती फिरुन संसाराला अग्नीपासुन सरंक्षण दे, आमचा राग, द्वेश, लोभ, मत्सर या आपल्या आग्नीत जळुन खाक होवुन दे, अशी मनोभावे प्रार्थना होळीभोवती प्रदक्षिणा घलतांना केली जाते़ होळी व धुळवडीच्या दोन दिवस ग्रामीण भागात आदिवासी रात्रभर ढोलनाच, तारपानाच, गरबानृत्य आदी मनोरंजनात्मक कार्यक्रम केले जातात़ या दोन दिवसांत होळीच्या व धुलवंडीच्या दिवशी घरोघरी गोड पुरणपोळया केल्या जातात़ धुळवडीला मनसोक्त धुळवड खेळली जाते़ तर रंगपंचमीला आजही गावाकडे झाडपाला, फुलांपासुन तयार केलेला नैसगिग रंगच वापरला जातो़