शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
6
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
7
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
8
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
9
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
10
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
11
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
12
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
13
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
14
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
15
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
16
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
17
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
18
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
19
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
20
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

जंगली श्वापदांमुळे शेतकऱ्यांना ३० लाखांचा फटका

By admin | Updated: February 1, 2015 23:00 IST

नैसर्गिक आपत्ती व शासकीय उदासीानतेच्या चाकात फसलेल्या शेतकऱ्यांना जंगली श्वापदांच्या हल्ल्याचाही सामना करावा लागत आहे. डिसेंबर २०१४ अखेर पर्यंत जंगली श्वापदांच्या हल्ल्यात

रूपेश खैरी - वर्धानैसर्गिक आपत्ती व शासकीय उदासीानतेच्या चाकात फसलेल्या शेतकऱ्यांना जंगली श्वापदांच्या हल्ल्याचाही सामना करावा लागत आहे. डिसेंबर २०१४ अखेर पर्यंत जंगली श्वापदांच्या हल्ल्यात शेतकऱ्यांचे ३० लाख ३४ हजार ११८ रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती आहे. यातील काही शेतकऱ्यांना मदत मिळाली तर काहंीना अद्यापही मदतीची प्रतीक्षा कायम आहे. जिल्ह्यात बोर अभयारण्य आहे तर जिल्ह्याच्या सिमेवर ताडोबाच्या जंगलाचा काही भाग येत आहे. या जंगलातील श्वापदे अन्नाच्या शोधात येत लगतच्या शेतात धुडगूस घालतात. या श्वापदांकडून शेतातील कोणत्याही एका भागातील पिकाचे नुकसान होते. नुकसान करून पळून जाताना ही श्वापदे शेतातील पूर्ण पिकच तुडवत असल्याचे चित्र आहे. वन विभागाकडून मात्र एकाच भागातील पिकाची पाहणी करून मदत मिळते. जिल्ह्यात या श्वापदांनी एकूण ४९९ शेतकऱ्यांच्या शेतातील पीक उद्ध्वस्त केले. याची पाहणी वनविभागाच्यावतीने करण्यात आली असून काही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात आली आहे. तर काही शेतकरी अद्यापही मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांना अनुदान नसल्याचे कारण सांगण्यात येत आहे. या वन्य प्राण्यांनी केवळ शेतीचेच नाही तर शेतकऱ्यांच्या पशुधनावरही हल्ला चढविला आहे. त्यांनी जिल्ह्यात यंदाच्या सत्रात आतापर्यंत एकूण ९१ जनावरांचा फडशा पाडला आहे. तर १३ व्यक्तींवर हल्ला केला आहे. सुदैवाने यात एकाचाही मृत्यू झाला नाही. या सर्व प्रकरणात वनविभागाच्यावतीने मदत देण्यात असली तरी या मदतीकरिता वनविभागाच्या कार्यालयात चकरा मारणे शेतकऱ्यांना परवडणारे नाही. अशात कधी नियमाची आडकाठी तर कधी अनुदान नसल्याचा रोडा असल्यामुळे शेतकऱ्यांना नाईलाजास्तव या नुसानीचा सामाना करावा लागत आहे. यावर शासनाच्यावतीे ठोस उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.