शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
6
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
7
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
8
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
9
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
10
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
11
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
12
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
13
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
14
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
15
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
16
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
17
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
18
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
19
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
20
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

दहेगाव (गो) पोलिसांना निवारा कधी मिळणार?

By admin | Updated: October 14, 2015 02:14 IST

येथे २००२ मध्ये पोलीस स्टेशनची निर्मिती झाली. परंतु तेरा वर्षे लोटूनही पोलिसांना निवासासाठी वसाहती बांधण्यात आलेल्या नाही.

१३ वर्षांपासून प्रतीक्षा : अनेक वर्षांपासून मागणी प्रलंबितदहेगाव (गोसावी) : येथे २००२ मध्ये पोलीस स्टेशनची निर्मिती झाली. परंतु तेरा वर्षे लोटूनही पोलिसांना निवासासाठी वसाहती बांधण्यात आलेल्या नाही. त्यामुळे येथील पोलिसांना निवारा कधी मिळणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. २००२ पूर्वी दहेगाव हे सिंदी (रेल्वे) पोलीस स्टेशन अंतर्गत येत होते. या गावात मोठ्या प्रमाणात वादंग होत असल्याने सदर गाव शासनाच्या काळ्या यादीत होते. त्यामुळे येथे पोलीस स्टेशन होवून शांतता व सुव्यवस्था राहावी, यासाठी तत्कालीन विधानसभा उपाध्यक्ष प्रमोद शेंडे यांच्या मार्गदर्शनात व तत्कालीन जि.प. उपाध्यक्ष तथा विद्यमान जि. प. सदस्य अरुण उरकांदे यांच्या सहकार्याने येथे पोलीस स्टेशनची निर्मिती झाली. सेलू तालुक्यातील हे तिसरे पोलीस स्टेशन आहे. सदर पोलीस स्टेशन हे स्मशानभूमी परिसरात असल्यामुळे निवासस्थानाअभावी जळत्या प्रेताकडे बघत पोलिसांना दिवस काढावे लागतात.येथे केवळ ठाणेदारांसाठी निवासस्थान बांधण्यात आले. उर्वरित पोलिसांसाठी निवासस्थान नसल्यामुळे त्यांना ४० ते ५० किमी अंतरावरून ये-जा करावी लागते. पोलिसांची ड्युटी चोवीस तास असते. वेळेवर पोहचण्यासाठी धावपाळ करीत वाहनाने पोहचताना अपघाताची शक्यता असते. येथे पोलिसांसाठी वसाहत बांधण्यासंदर्भात बांधकाम विभागाकडे सुचित केल्याचे सांगितले जाते. परंतु अद्याप वसाहतीचा पत्ता नाही. पोलीस अधीक्षक अंकीत गोयल यांनी या समस्येकडे लक्ष देत पोलिसांच्या निवासासाठी विशेष प्रयत्न करावे, अशी मागणी केली जात आहे.(वार्ताहर)