जिल्ह्यात दारूबंदी असताना मोठ्या प्रमाणात दारू पकडला जात आहे. यात शनिवारी वर्धा पोलिसांच्या विशेष पथकाने चार लाख रुपयांचा दारूसाठा नष्ट केल्याची माहिती देण्यात आली. या व्यतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनात दारूबंदी पथकाने इतवारा, आनंदनगर व पुलफैल येथे सुरू असलेल्या दारूभट्टीवर धाड टाकत कारवाई केली. सुरू असलेल्या अनेक भट्ट्या उद्ध्वस्त करण्यात आल्या. ही कारवाई पथकाचे पोलीस उपनिरीक्षक गजानन जाधव, एस.बी मुल्ला, संजय मांते यांच्यासह पोलीस पथकाने केली.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}